श्रेयस तळपदेला नक्की काय झालंय? एका डोळ्याला पट्टी पाहून चाहते चिंतेत

श्रेयस तळपदेला नक्की काय झालंय? एका डोळ्याला पट्टी पाहून चाहते चिंतेत

श्रेयस तळपदेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोमुळे त्याचे सर्व चाहते चिंतेत आहेत.

  • Share this:

मुंबई, 3 मे : बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो नेहमीच त्याच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना दिसतो. सध्या लॉकडाऊनमध्ये श्रेयस सुद्धा सरकारच्या नियमांचं काटेकोर पालन करत आहे. अशात त्यानं त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यात त्याच्या एका डोळ्याला बॅन्डेड केल्यासारखी पट्टी दिसत आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोमुळे त्याचे सर्व चाहते चिंतेत आहेत.

श्रेयस तळपदेनं त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याच्या एका डोळ्याला पट्टी दिसत आहे. हा फोटो शेअर करताना श्रेयसनं लिहिलं, क्वारंटाईनचे इफेक्ट. मी चुकीच्या जागेवर मास्क लावलेला नाही. तुम्ही सांगू शकता का हे काय झालं असेल. श्रेयसच्या या फोटोवर त्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहे. श्रेयसला काही दुखापत तर झाली नाही ना असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. या फोटोवर चाहत्यांच्या अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत.

मराठीनंतर बॉलिवूडमध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या श्रेयसनं मराठी मालिकांमधून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. मराठी मालिका 'दामिनी' मधील त्याची भूमिका त्यावेळी प्रचंड गाजली आणि त्यानंतर त्याला यश मिळत गेलं. बॉलिवूडमध्ये इकबाल या सिनेमानं श्रेयसला स्वतःची वेगळी ओळख मिळवून दिली. त्याच्या भूमिकेच खूप कौतुकही झालं. श्रेयस काही काळापूर्वी सेटर्स या सिनेमात दिसला होता.

(संपादन- मेघा जेठे.)

वेब गर्ल मिथिलानं गाणं गात इरफान खानला वाहिली श्रद्धांजली, पाहा VIDEO

'आता थुंकणं पुन्हा सुरू होईल' सरकारच्या पान शॉपबाबतच्या निर्णयावर रवीनाची नाराजी

First published: May 3, 2020, 2:28 PM IST

ताज्या बातम्या