मुंबई, 4 मे- टायगर श्रॉफ स्टारर 'स्टुडंट ऑफ दी इअर 2' सिनेमा प्रदर्शित व्हायला आता काही दिवसच राहिले आहेत. सध्या या सिनेमाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये मजबूत घाम गाळताना दिसत आहे. आता प्रत्येक दिवस आणि क्षण या सिनेमासाठी महत्त्वाचा आहे. दरम्यान, या सिनेमाचं अजून एक गाणं प्रदर्शित झालं आहे. फकीरा गाण्यात टायगर आणि अनन्या पांडे यांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळते. करण जोहरने सोशल मीडियावर हे गाणं शेअर केलं.
आतापर्यंत या सिनेमाला 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं असून अनेकांना हे गाणं आवडतही आहे. विशाल- शेखरचं संगीत असलेलं हे गाणं अंविता दत्तने लिहिले असून या गाण्याला सनम पुरी आणि निती मोहन यांनी हे गाणं गायलं आहे. 'फकिरा' गाण्याआधी करणने आलिया भट्ट आणि टायगर श्रॉफचं हुकअप गाणं शेअर केलं होतं. टायगर हा उत्कृष्ट डान्सर आहे हे सारेच जाणतात. पण या गाण्यात आलियाने त्याला तोडीस तोड साथ दिली अशीच प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळते.
‘मला माहीत होतं की ती मुलगी योग्य नाही,’ जेव्हा रणबीरच्या रिलेशनशिपवर बोलल्या नीतू कपूर
'स्टुडंट ऑफ द इअर 2'मधून अनन्या पांडे आणि तारा सुतारिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर 12 एप्रिलला रिलीज झाला होता. ट्रेलरला नेटीझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. या सिनेमातून टायगर श्रॉफला पहिल्यांदा करण जोहर सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. याआधी 2012मध्ये रिलीज झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इअर'मधून अलिया भट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं आणि आता हे तिघंही बॉलिवूडमधील यशस्वी कलाकार आहेत.
दोघींच्या बोल्ड प्रणयदृश्यांचा व्हिडिओ व्हायरल; प्रिया बापटच्या 'त्या' सीनची चर्चा
'स्टूडंट ऑफ दी इअर 2' सिनेमाचे कलाकार टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांनी एका मुलाखतीत स्पष्ट सांगितलं की, हा एक मनोरंजनात्मक सिनेमा आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना प्रेक्षकांनी फार डोकं लावू नये. गेल्या आठवड्यात सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळाला. काहींनी कलाकारांचं कौतुक केलं तर काहींनी ट्रेलरला नावं ठेवली. वास्तवाशी या सिनेमाचा काहीही संबंध नसल्याच्या कमेंट अनेकांनी केल्या.
गॅब्रिएलाच्या चेहऱ्यावर प्रेग्नसीचा ग्लो, अर्जुन रामपाल अशी घेतो काळजी
यावेळी सिनेमाबद्दल बोलताना अनन्या म्हणाली की, ‘प्रेक्षकांना एका वेगळ्या दृष्टीकोनातून हा सिनेमा पाहिला पाहिजे. हा पूर्णपणे एण्टरटेनमेन्ट देणारा सिनेमा आहे.’ तर सिनेमाचा मुख्य अभिनेता टायगर श्रॉफ म्हणाला की, ‘हा आजच्या तरुणाईचा सिनेमा आहे. प्रत्येकासाठी हा सिनेमा मनोरंजनात्मक असेल यात काही वाद नाही. तसेच सिनेमा पाहताना फार डोकं लावू नका.’
श्रीदेवीचा विषय निघताच रडले बोनी कपूर VIDEO VIRAL