श्रीदेवीचा विषय निघताच रडले बोनी कपूर VIDEO VIRAL

श्रीदेवी यांचं निधन होऊन आता एक वर्षाहून अधिक काळ झाला. पण आजही प्रत्येकक्षणी बोनी कपूर यांना श्रीदेवी यांची आठवण येते.

News18 Lokmat | Updated On: May 4, 2019 05:59 PM IST

श्रीदेवीचा विषय निघताच रडले बोनी कपूर VIDEO VIRAL

मुंबई, 4 मे- निर्माते बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना विसरून आयुष्यात पुढे जाणं हे खूप कठीण असल्याचं म्हटलं आहे. श्रीदेवी यांचा विषय निघताच ते भावुक झाले आणि भरल्या अंतःकरणाने बोनी म्हणाले की, तिला विसरणं माझ्यासाठी अशक्य आहे. सिनेव्यापार विश्लेषक कोमल नाहता यांच्या और एक कहानी या चॅट शोमध्ये ते बोलत होते.

दोघींच्या बोल्ड प्रणयदृश्यांचा व्हिडिओ व्हायरल; प्रिया बापटच्या 'त्या' सीनची चर्चा

श्रीदेवी यांचं निधन होऊन आता एक वर्षाहून अधिक काळ झाला. पण आजही प्रत्येकक्षणी बोनी यांना श्रीदेवी यांची आठवण येते. नाहता यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शोचा टीझर शेअर केला. ४० सेकंदांच्या या टीझरमध्ये बोनी हेच सांगताना दिसत आहेत की त्यांच्यासाठी श्रीदेवी यांना विसरणं हे निव्वळ अशक्य आहे.

Why did ostentatious producer Boney Kapoor @BoneyKapoor get emotional on Komal Nahta Aur Ek Kahani? See for yourself in this trailer and then on the show on Sunday, May 5, 1 p.m. on Tata Sky’s Classic Cinema channel (no. 318). @Subhash_somani @PRIYANKAAWASTHY@sukrit_banerjee pic.twitter.com/ucD9o03ZHr


Loading...


मराठी मालिकांमध्ये काम करणारी 'ती' चालवते रिक्षा, बोमन इराणींनी शेअर केला व्हिडिओ

कोमल यांनी बोनी यांना अनेक विषयांवर प्रश्न विचारले. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी हसत- खेळत दिलं. पण जेव्हा नाहता यांनी श्रीदेवींची आठवण येते का हा प्रश्न विचारला तेव्हा बोनी थोडे गहिवरले. त्यांनी ‘हे अशक्य आहे’ असं उत्तर दिलं.

गॅब्रिएलाच्या चेहऱ्यावर प्रेग्नसीचा ग्लो, अर्जुन रामपाल अशी घेतो काळजी

चुकीच्या आर्थिक निर्णयाबद्दल नाहता यांनी बोनी यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, ‘मी माझा पैसा काही वाईट कामांसाठी वापरला नाही. मी काही रेसवर किंवा जुगारात पैसा लावला नाही. हे लोकांना कळलं पाहिजे. मी काही चुका केल्या आणि त्याची मला जाणीव आहे. अशावेळी जर तुम्हाला तुमच्या घरच्यांकडून आणि खासकरून पत्नीकडून पाठिंबा मिळाला नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही.’ गेल्यावर्षी २४ फेब्रुवारीला दुबईत श्रीदेवी यांचा अपघाती मृत्यू झाला. मृत्यूनंतर ‘मॉम’ सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न दुसऱ्यांदा मोडलं, Instagram वरच्या 'या' फोटोंमुळे झालं उघड

VIDEO VIRAL प्रियांका चोप्रा झाली सोफी टर्नरची ब्राइड्समेड; लग्नात केला धमाल डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 4, 2019 05:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...