सुशांत केस ड्रग्स प्रकरण: भाजप आमदारानं उद्धव ठाकरे सरकारला केला खोचक सवाल

सुशांत केस ड्रग्स प्रकरण: भाजप आमदारानं उद्धव ठाकरे सरकारला केला खोचक सवाल

मुंबई पोलिसांनी तपास केला त्यावेळी ड्रग्स विषय समोर का आला नाही, मुंबई पोलिसांनी दुर्लक्ष केलं का की कोण्या ड्रग्स माफिया नेत्याला त्यांना वाचायवायचे होते?

  • Share this:

मुंबई, 26 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी (Sushan Singh Rajput Death) सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. तर दुसरीकडे याप्रकरणात अंमली पदार्थांचा (ड्रग्स) अँगल समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यात भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला खोचक सवाल विचारला आहे.

मुंबई पोलिसांनी तपास केला त्यावेळी ड्रग्स विषय समोर का आला नाही, मुंबई पोलिसांनी दुर्लक्ष केलं की कोण्या ड्रग्स माफियाला वाचवायचं होतं. मुंबई पोलिसांना कुठल्या नेत्याला वाचायवायचं होतं? याचं उत्तर राज्य सरकारनं द्यावे, अशी मागणी भाजपा प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी केली आहे.

हेही वाचा...SSR Case: 'चहामध्ये 4 थेंब टाक आणि त्याला...', रियाचे 6 WhatsApp चॅट समोर आल्याने खळबळ

रियाच्या अडचणी आणखी वाढणार?

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)देखील लवकरच तपास सुरू करत आहेत. ते ड्रग्स अँगलवरुन या प्रकरणाचा तपास केला जात आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे संचालक राकेश अस्थाना यांनी एका वृत्त वाहिनीशी फोनवर बातचीत करताना सांगितले की, आता सुशांतच्या प्रकरणात तपास सुरू करीत आहोत. त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मीडिया अहवालानुसार रियाचे WhatsApp चॅट समोर आल्याने अंमली पदार्थ तस्करीचे प्रकरण देखील समोर येत आहे. तिने काही लोकांशी बातचीत केल्याचे या अहवालात म्हटले आहे. दरम्यान रियाच्या वकिलाने या सर्व आरोपांते खंडन केले आहे.

कसा करणार एनसीबी अंमली पदार्थांसंबधीत तपास?

-दिल्ली एनसीबीचे मुख्यालय आर के पुरम येथे काल संध्याकाळी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. आजसुद्धा रात्री 11 वाजता दिल्ली मुख्यालयात एक महत्त्वाची बैठक होणार आहे.

-रियाचे ज्या ड्रग डीलर्सशी संबंध समोर आले आहेत, त्यांचा शोध NCB कडून घेतला जाणार आहे.

- एनसीबी रियाच्या त्याचप्रमाणे सुशांतच्या मित्रांबद्दल देखील माहिती गोळा करणार आहे. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीच्या मित्रांबाबत देखील माहिती गोळा केली जाणार आहे.

- एनसीबी रिया, सुशांत आणि शोविक यांच्यात झालेल्या फोन कॉलचा अभ्यास करणार

हेही वाचा.."तिने आयुष्यात कधीच ड्रग्ज घेतली नाहीत", रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी फेटाळला दावा

- एनसीबी मुंबई पुणे येथे नव्याने पकडून तुरुंगात टाकलेल्या अंमली पदार्थ तस्कारांची चौकशी करु शकते. कारण सुशांत मृत्यू प्रकरणात काही धागेदोरे सापडू शकतात.

- एनसीबी 2020, 2019 आणि 2018 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या रेव पार्टीचा शोध घेवून त्या रेव पार्ट्यांची सखोल चौकशी करणार आहे. जेणेकरुन त्यात अटक केलेल्या लोकांची चौकशी करुन त्यातून काही माहिती मिळू शकेल.

- एनसीबीच्या निशाण्यावर मुंबईतील सर्व ड्रग सिंडिकेट असतील. ज्यामध्ये छोट्या मोठ्या सर्व अंमली पदार्थ तस्करांची चौकशी करण्यात येणार आहे.

- एनसीबी आपल्या इंटेलिजेंस नेटवर्कद्वारे रियाचे सर्व दौरे, पार्ट्या, ती कोणत्या कोणत्या रेस्टॉरंटमध्ये-हॉटेल्समध्ये गेली, कोणत्या कॉफी शॉपमध्ये गेली, भारतात आणि परदेशात कुठे कुठे गेली याची चौकशी करणार आहे.

दरम्यान, सुशांतच्या मृत्यूचे दुबई कनेक्शन देखील एनसीबीकडून तपासण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दुबईतील ज्या ड्रग डील अयाश खानचे नाव समोर येत आहे, त्याची सर्व माहिती शोधण्यात येणार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 26, 2020, 12:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading