जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / SS Rajamouli: पाकिस्तानने परवानगी नाकारल्याने अधुरं राहिलं एसएस राजामौलींच 'ते' स्वप्न; काय आहे नेमकं प्रकरण?

SS Rajamouli: पाकिस्तानने परवानगी नाकारल्याने अधुरं राहिलं एसएस राजामौलींच 'ते' स्वप्न; काय आहे नेमकं प्रकरण?

एसएस राजामौली

एसएस राजामौली

एसएस राजामौली ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’ सारखे जागतिक हिट चित्रपट दिल्यानंतर आता ते प्रेक्षकांसमोर काय सादर करणार आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण त्याआधी त्यांचं एक स्वप्न अपूर्ण राहील होतं ज्याचा खुलासा नुकताच या दिग्दर्शकाने केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 01 मे:  एसएस राजामौली हे सध्याच्या काळातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहेत. ‘RRR’च्या जगभरातील यशानंतर एसएस राजामौली यांचे नाव सर्वांनाच ठाऊक आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला ‘बाहुबली’ फ्रँचायझी आणि ‘आरआरआर’ सारखे चित्रपट देणारे एसएस राजा यांनी 2009 मध्ये ‘मगधीरा’ नावाचा चित्रपट बनवला होता, जो या चित्रपटांप्रमाणेच हिट झाला होता. हा चित्रपट सुद्धा इतिहासकालीन कथेवरच आधारित होता. त्याचवेळी एस एस राजामौली पाकिस्तानात गेले होते. त्यांना तेथील इतिहासावर आधारित एक चित्रपट बनवायचा होता. पण पाकिस्तान सरकारने ती परवानगी नाकारली. आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर दिग्दर्शकाला खास आवाहन केल्यावर राजामौलींनी हा किस्सा सांगितला आहे. ‘RRR’ चित्रपटाने ऑस्कर मिळवून देणाऱ्या एसएस राजामौली यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’ सारखे जागतिक हिट चित्रपट दिल्यानंतर आता ते प्रेक्षकांसमोर काय सादर करणार आहे हे जाणून घेण्यासाठी केवळ चाहतेच नाही तर देशातील बड्या व्यक्तींनाही उत्सुकता आहे. पण अलीकडेच एक गोष्ट घडली, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल .  आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर हडप्पा काळातील एक फोटो पोस्ट केला आणि एसएस राजामौली यांना त्यावर चित्रपट बनवण्याचे आवाहन केले, ज्याच्या उत्तरात दिग्दर्शकाने पाकिस्तानशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

ट्विटरवर आनंद महिंद्रा यांनी एसएस राजामौली यांचे कौतुक करताना म्हटले आहे की, “कोण इतिहास जिवंत करतो आणि आपल्या कल्पनेला प्रज्वलित करतो याचे एक अद्भुत उदाहरण. एसएस राजामौली यांनी त्या कालखंडावर आधारित चित्रपट बनवण्याचा विचार करावा, जो त्या प्राचीन सभ्यतेबद्दल जागतिक जागरूकता वाढवेल.’ मोहेंजोदारो हे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एक पुरातत्व स्थळ आहे. Virushka Love Story: विराट अनुष्काच्या नात्यात आलेला दुरावा; ब्रेकअपनंतर पुन्हा असे एकत्र आले लव्हबर्ड्स; रंजक आहे लव्हस्टोरी एसएस राजामौली यांनी काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील मोहेंजोदारोला भेट देण्याची परवानगी कशी नाकारली गेली हे सांगून प्रतिक्रिया दिली. दिग्दर्शकाने लिहिलं, ‘होय सर… धोलावीरात मगधीराचं शूटिंग करत असताना मला एक झाड दिसलं जे जीवाश्म बनलं होतं. त्या झाडाकडे बघून मला सिंधू संस्कृतीच्या उदय आणि अस्तावरील चित्रपटाचा विचार आला. पण मी काही वर्षांनी पाकिस्तानला गेलो, मोहेंजोदारोला भेट देण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, खेदाने मला तिथे जाण्याची परवानगी नाकारण्यात आली.’ असं राजामौलींनी सांगितलं आहे.

जाहिरात

RRR ने जगभरात 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. या चित्रपटात राम चरण आणि जूनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. ‘RRR’ मधील ‘नातू नातू’ने यावर्षी ऑस्कर आणि गोल्डन ग्लोबही पटकावले आहेत. एसएस राजामौली सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात