बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडे पॉवर कपल म्हणून पाहिले जाते. दोघांची जोडी चाहत्यांना खूपच आवडते.
अनुष्का आणि विराटची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. आधी मैत्री, मग प्रेम आणि ब्रेकपपर्यंत दोघांचं नातं पोहचलं होतं.
2013 मध्ये एका शॅम्पूच्या जाहिरातीदरम्यान अनुष्का आणि विराटची भेट झाली होती. विराटने सांगितले की, अनुष्काला पहिल्यांदा भेटल्यामुळे तो खूप घाबरला होता.
यावेळी विराट नर्व्हस असल्याचे अनुष्काला समजले होते. अशा स्थितीत तिथले वातावरण हलके करण्यासाठी अनुष्काने एक विनोद सांगितला. येथूनच दोघांची मैत्री झाली.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 2014 सालापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल चर्चेत होते. दोघांनाही जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा ते एकमेकांना भेटायचे. त्याच वर्षी हैदराबादमध्ये झालेल्या वनडे सामन्यात विराटने अर्धशतक झळकावले होते. शतक ठोकल्यानंतरच विराटने अनुष्काला बॅटमधून फ्लाइंग किस दिला.
तेव्हा दोघेही सर्वांच्या नजरेत आले होते आणि त्यांच्याबद्दल बरीच चर्चा झाली होती. यावर्षी विराट अनुष्काला तिच्या वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी उदयपूरला पोहोचला जिथे ती 'वेल्वेट' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होती.
2016 हे वर्ष विराट आणि अनुष्कासाठी चांगले राहिले नाही. हे वर्ष दोघांच्या नात्यासाठी खूप कठीण गेले. त्याच वर्षी सोशल मीडियावर त्यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. विराट आणि अनुष्काने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले होते.
डिसेंबर 2016 मध्ये, त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान, दोघेही युवराज सिंगच्या लग्नात एकत्र पोहचले होते. दरम्यान, पुन्हा एकदा त्यांच्यात मैत्री झाली आणि सर्व जुन्या गोष्टी विसरून ते दोघे पुन्हा जवळ आले.
2017 मध्ये विराट आणि अनुष्काच्या लग्नाबाबत अनेक बातम्या येऊ लागल्या. त्यानंतर 11 डिसेंबर 2017 रोजी अखेर त्यांचे लग्न झाले. दोघांनी इटलीतील लेक कोमो येथे गुपचूप लग्न केले होते.