मुंबई. 09 फेब्रुवारी : बॉलिवूडची चांदनी अर्थात अभिनेत्री श्रीदेवी. तिच्या बहारदार व्यक्तिमत्त्वानं, सौंदर्यानं आणि अभिनयानं तिनं प्रेक्षकांवर राज्य केलं. तिच्या अभिनयाची जाई आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. एका यशस्वी करिअरनं प्रेक्षकांवर आपली वेगळी छाप पाडणाऱ्या श्रीदेवीचं 2018मध्ये दुर्दैवी निधन झालं. तिचं जाणं हे बॉलिवूड सिनेसृष्टीसाठी मोठा धक्का आणि कधीही न भरून येणारी पोकळी होती. पण आता श्रीदेवीच्या संपूर्ण आयुष्याची कहाणी आता पुस्तक स्वरुपात वाचता येणार आहे. ‘श्रीदेवी - द लाइफ ऑफ अ लेजेंड’ हे पुस्तक 2023मध्ये प्रकाशित केलं जाणार आहे. श्रीदेवीचा पती बोनी कपूर यांनी बायकोच्या पुस्तकाची माहिती दिली आहे. श्रीदेवीची पाचवी पुण्यतिथी येत्या 24फेब्रुवारीला आहे. याच निमित्तानं तिच्या आयुष्यावर आधारीत पुस्तकाच्या प्रकाशनाची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. साधारण 2023च्या शेवटी पुस्तक प्रकाशित होण्याची माहिती समोर येतेय. हेही वाचा - valentines day 2023: …म्हणून ऐश्वर्यानं सलमानला सोडून धरला अभिषेक बच्चनचा हात; दोघांची ब्रेकअप स्टोरी फारच थ्रीलर ‘श्रीदेवी - द लाइफ ऑफ अ लेजेंड’ या पुस्तकाची घोषणा बोनी कपूर यांनी ट्विट करत केली आहे. त्यांनी लिहिलंय, ‘श्रीदेवी ही नैसर्गिक शक्ती होती. जेव्हा जेव्हा ती तिच्या चाहत्यांसमोर मोठ्या स्क्रिनवर तिची कला सादर करायची तेव्हा तेव्हा ती सर्वाधिक आनंदी असायची. धीरज कुमार ही अशी व्यक्ती आहे ज्यांना श्रीदेवी आपलं कुटुंब मानत होती. तेच या पुस्तकाचे रिसर्चर आणि लेखक आहेत. श्रीदेवीच्या असमान्य जीवनाला साजेसे असं पुस्तक ते लिहित आहेत याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. पुस्तक वेस्टलँड बुक्सतर्फे लवकरच प्रकाशित करण्यात येईल’.
@SrideviBKapoor @AuthorDhiraj @WestlandBooks @karthikavk @Blind_glass @LabyrinthAgency pic.twitter.com/5TmyP7fLGT
— Boney Kapoor (@BoneyKapoor) February 8, 2023
बोनी कपूर यांनी ‘श्रीदेवी - द लाइफ ऑफ अ लेजेंड’ ची घोषणा करताना पुस्तकाची काही पानं शेअर केली आहेत. ज्यात पहिल्या पानावर श्रीदेवी विषयी लिहिण्यात आलं आहे. तसंच तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या क्षणांचे फोटो लावण्यात आलेत.
24 फेब्रुवारी 2018ला श्रीदेवीचं हॉटेलच्या बाथटबमध्ये पडून मृत्यू झाला. दुबईत एका नातेवाईकाच्या लग्नाला गेली असता बाथरूममध्ये श्रीदेवीला हार्ट अटॅक आल्यानं तिचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. श्रीदेवीनंतर तिची मुलगी जान्हवी कपूर सिनेसृष्टीत सक्रीय झाली आहे. धडक या सिनेमातून जान्हवीनं बॉलिवूडमध्ये एंट्री केली.