मुंबई, 26 मे : कमल हासन हे दक्षिण आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्वाचं नाव आहे. त्यांनी केवळ अभिनेता, दिग्दर्शक म्हणून काम केले नाही तर पटकथा लेखक, गीतकार, पार्श्व आणि नृत्यदिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. या अभिनेत्याने गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्याने आपल्या फिल्म प्रोडक्शन कंपनी 'राजकमल इंटरनॅशनल' अंतर्गत अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. आपल्या करिअरसोबतच कमल हसन वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आले. त्यांना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीशी लग्न करण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र त्यांनी या लग्नाला नकार दिला. ही अभिनेत्री होती श्रीदेवी.
कमल हसन आणि श्रीदेवी यांची पहिली भेट 1976 मध्ये तामिळ चित्रपट 'मुंद्रू मुदिचू'च्या सेटवर झाली होती. लवकरच दोघे चांगले मित्र बनले. त्यानंतर, कमल आणि श्रीदेवी यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेक रोमँटिक सीन्स देखील दिले. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना ते फक्त सहकलाकार नाहीत तर चांगले मित्र देखील आहेत याची खात्री पटली. कमलने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसोबतची त्यांची उत्तम केमिस्ट्री लोकांना पटली. त्यांची जोडी पडद्यावरील सर्वात रोमँटिक जोडींपैकी एक आहे. दोघांनी 'गुरु', 'वरुमायिन निरम शिवप्पू', 'वाजवे मायाम' आणि 'मूंद्रम पिराई' यांसारख्या अनेक साऊथ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्याच्या चाहत्यांनाही त्यांनी खऱ्या आयुष्यात एकमेकांसोबत असायला हवे होते.
कमल हसनने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसोबत सदमा चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री सगळ्यांना चांगलीच आवडली होती. श्रीदेवीच्या आईलाही कमल हासन खूप आवडायचे. तिने आपल्या मुलीशी लग्न करावे अशी तिची इच्छा होती. श्रीदेवीने हे जग सोडल्यानंतर, कमल हासनने 'श्रीदेवीचे 28 अवतार' नावाची एक नोट लिहिली ज्यामध्ये त्यांनी सांगितले की ते आणि श्रीदेवी खूप चांगले मित्र होते. तिच्या आईने अनेकदा त्यांच्याशी तिच्या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
पण तो श्रीदेवीला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानत होता आणि तो तिच्याशी लग्न करू इच्छित नव्हता. त्यांनी हे सांगताना 'ही चर्चा झाल्यावर मी हसून तिच्या आईला सांगायचो की श्री आणि मी एकमेकांना इतके वेड्यात काढू की दुसऱ्याच दिवशी मला तुम्हाला माझ्या घरी परत पाठवावे लागेल.' असं देखील सांगितलं होतं.
श्रीदेवीने 1996 मध्ये प्रसिद्ध निर्माता बोनी कपूर यांच्याशी लग्न केले. आता त्यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. तर कमल हसनने 1978 मध्ये डान्सर वाणी गणपतीशी लग्न केले. कमलने 10 वर्षांनंतर घटस्फोट घेतला आणि नंतर सारिकाशी लग्न केले, ज्याच्यापासून त्याला श्रुती आणि अक्षरा या दोन मुली होत्या. 2004 मध्ये कमल आणि सारिका सुद्धा वेगळे झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Kamal hassan