मुंबई, 25 मे : बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थींनी वयाच्या 57 व्या वर्षी दुसरे लग्न केले. त्याच्या लग्नाची बातमी समोर येताच त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. काहींनी त्यांच्या वयावर तर काहींनी त्यांची माजी पत्नी राजोशी बरुआ यांच्याविषयी प्रश्न उपस्थित केले. आता अखेर आशिष विद्यार्थीनी आपल्या लग्नाविषयी स्वतः चाहत्यांसमोर खुलासा केला असून त्यांनी असं का केलं त्याविषयी मौन सोडलं आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून अभिनेत्याने प्रत्येकांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. आशिष विद्यार्थी यांनी दुसरे लग्न, पत्नी आणि मुलगा अर्थ विद्यार्थी याविषयी काय सांगितले आहे ते जाणून घ्या.
आशिष विद्यार्थींनी अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ते म्हणाले की, 'आपल्या सर्वांचे जीवन वेगळं आहे आणि आपल्या सर्वांच्या गरजा वेगळ्या आहेत. प्रत्येकाला वेगवेगळ्या संधीही मिळतात. प्रत्येकजण आपापल्या परीने आयुष्य जगत असतो. पण एक गोष्ट कॉमन आहे, आपण सगळ्यांना आपलं आयुष्य आनंदाने जगायचं आहे. तसाच 22 वर्षांपूर्वी उशी माझ्या आयुष्यात आली. आमच्या दोघांची खूप छान मैत्री झाली. नवरा-बायको म्हणून हा प्रवास खूप छान झाला. याच दरम्यान आमचा लाडका मुलगा अर्थ म्हणजेच मोगली आमच्या आयुष्यात आला.'
घटस्फोट आणि विभक्त होण्याबद्दल बोलताना आशिष विद्यार्थी सांगतात की, 'या 22 वर्षांच्या प्रवासात, अडीच किंवा दोन वर्षांपूर्वी, आम्हाला समजलं की, आम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहोत त्या पूर्णपणे भिन्न आहेत. आम्ही दोघांनी हे मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला एकमेकांवर वर्चस्व गाजवायचे नव्हते. आम्हाला फक्त स्वतःला किंवा इतरांना दाखवण्यासाठी एकत्र असण्याचा आव आणायचा नव्हता. वेगळे राहत असताना लग्नाचे नाटक करणाऱ्या लोकांची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. पण आम्हा दोघांचे तसे नाही. त्यामुळेच आम्ही वेगळे होण्याचा विचार केला.'
राजोशी पासून विभक्त झाल्याबद्दल आशिष विद्यार्थी म्हणतात, 'आता आमचे मार्ग वेगळे आहेत. दोघांनी मिळून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आमच्यात नाराजी किंवा भांडण नाही. दोघांनीही मुलाशी आणि जवळच्या लोकांशी बसून गप्पा मारल्या आणि आयुष्यात एक नवीन पाऊल टाकलं.
View this post on Instagram
आशिष विद्यार्थ्याने दुसऱ्या लग्नावरही मौन सोडलं आहे. रुपाली बरुआ यांना कधी आणि कशी भेटली हे त्यांनी सांगितले. तो म्हणाला, 'आयुष्याच्या या वाटेवर मला एकटं राहायचं नव्हतं. दरम्यान मला रुपाली सापडली. आम्ही एक वर्ष बोलत आहोत. तेव्हा मला वाटले की मला माझे आयुष्य तिच्यासोबत घालवायचे आहे. मला रिलेशनशिपमध्ये राहायचे नव्हते. त्यामुळेच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. रुपाली 50 वर्षांची आहे, त्यामुळे मी 60 नाही तर 57 वर्षांचा आहे. तुमचे आशीर्वाद कायम राहतील अशी आशा आहे.
आशिष विद्यार्थीने 25 मे 2023 रोजी आसाममधील रहिवासी रुपाली बरुआसोबत लग्न केले होते. दोघांचे कोर्ट मॅरेज होते. त्याचवेळी आशिष आणि त्याची माजी पत्नी राजोशी यांनी 7 महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.