मुंबई, 13 जुलै- बॉलिवूड (Bollywood) दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण 7’ (Koffee With Karan 7) नुकतंच सुरु झाला आहे. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांनी शोच्या पहिल्या एपिसोडला हजेरी लावली होती. या दोघांचा पहिला एपिसोड प्रचंड हिट ठरला होता. त्यांनतर आता सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) करण जोहरच्या चॅट शोच्या पुढच्या एपिसोडमध्ये पाहुण्या कलाकार म्हणून हजेरी लावणार आहेत. या एपिसोडमध्ये साराने असं काही सांगितलं, ज्यामुळे सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत. करण जोहरने शोच्या दुसऱ्या एपिसोडचा एक इंटरेस्टिंग प्रोमो रिलीज केला आहे. ज्यामध्ये करण जोहर शोमध्ये आलेल्या सारा अली खान आणि जान्हवी कपूरसोबत धम्माल करताना दिसून येत आहे. दरम्यान करणने साराला विचारलं तुला कोणत्या स्टारला डेट करायला आवडेल? या प्रश्नाचं उत्तर देत साराने साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाचं (Vijay Deverkonda) नाव घेतलं होतं. यावर आता अभिनेत्यानेसुद्धा उत्तर दिलं आहे.
साराच्या या वक्तव्यावर साऊथ अभिनेता विजय देवरकोंने प्रतिक्रियाही दिली आहे. अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर साराच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. विजयने ‘कॉफ़ी विथ करण सीजन 7’ चा एक ट्रेलर शेअर केला ज्यामध्ये साराने त्याच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर प्रतिक्रिया देत विजयने लिहलंय,- “तुम्ही ‘देवरकोंडा’ कसं म्हणता ते मला प्रचंड आवडतं. ते सर्वात सुंदर आहे. तुमच्यासाठी खुपत सारं प्रेम आणि एक घट्ट मिठी ’’ यासोबतच अभिनेत्याने हार्ट इमोजीसेखील शेअर केले आहेत. **(हे वाचा:**
KL Rahul - Athiya shetty लवकरच करणार लग्न! मुंबईत होणार जंगी विवाह
) समोर आलेल्या या प्रोमोमध्ये, करण साराला अशा एका अभिनेत्याबद्दल प्रश्न विचारतो ज्याच्यावर तिला क्रश आहे किंवा तिला डेट करण्याची इच्छा आहे.यावर साराने उत्तर देत विजय देवरकोंडाचं नाव घेतलं होतं.मात्र साराला हा आपला कॉफी विथ करणचा डेब्यू एपिसोड वाटत होता. वास्तविक, करण जोहरच्या याच शोच्या 2018 च्या एपिसोडमध्ये, जेव्हा सारा तिचे वडील सैफ अली खानसोबत शोमध्ये पोहोचली होती तेव्हा तिला असाच प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्यावेळी तिने कार्तिक आर्यनचे नाव घेतले होते.