लंडन, 12 जुलै : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. या सामन्यात इंग्लंड संघाची फलंदाजी पत्त्याचा बंगला कोसळावा तशी ढेपाळली. इंग्लंडचा संपूर्ण डाव 25.2 षटकात केवळ 110 धावांवर आटोपला. यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सामन्यात एकूण विक्रमी 6 बळी घेतले तर मोहम्मद शमीने 3 फलंदाजांना तंबूत पाठवले. प्रसिद्ध कृष्णालाही 1 बळी मिळाला. भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात इंग्लंडची सर्वात कमी धावसंख्या एकदिवसीय प्रकारात इंग्लंडला भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या उभारता आली. यापूर्वी, 2006 मध्ये जयपूर येथे खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात इंग्लंडचा संघ भारतीय गोलंदाजांनी 125 धावांत गुंडाळला होता. एवढेच नाही तर जसप्रीत बुमराहने एक खास कामगिरीही आपल्या नावावर केली. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी केली. बुमराहने या सामन्यात अवघ्या 19 धावांत 6 विकेट घेतल्या. बुमराहची विशेष कामगिरी बुमराह वनडेत अशी कामगिरी करणारा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला. या यादीत स्टुअर्ट बिन्नी पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध अवघ्या 4 धावांत 6 बळी घेतले होते. त्याच वेळी, अनुभवी फिरकीपटू आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेने 1993 मध्ये कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 12 धावांत 6 बळी घेतले होते. IND vs ENG: सूर्याच्या 360 डिग्री बॅटिंगला ग्रहण, मुंबईकरच ठरला पराभवाचा व्हिलन! जोस बटलरच्या सर्वाधिक 30 धावा या सामन्यात कर्णधार जोस बटलरने इंग्लंडकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने 32 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 30 धावांचे योगदान दिले. त्याच्याशिवाय डेव्हिड विलीने 21, ब्रायडन कार्सने 15 आणि मोईन अलीने 14 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकड्याला स्पर्श करता आला नाही. यजमानांना 9 अतिरिक्त धावाही मिळाल्या. इंग्लंडमध्ये गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी इंग्लंडच्या भूमीवर गोलंदाजाच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल बोलायचे तर, पाकिस्तानचा महान खेळाडू वकार युनूस या यादीत अव्वल स्थानावर आहे, ज्याने 2001 मध्ये लीड्समध्ये 36 धावांत 7 बळी घेतले होते. दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा विन्स्टन डेव्हिस आहे, ज्याने 1983 मध्ये 51 धावांत 7 बळी घेतले होते. ऑस्ट्रेलियाच्या गॅरी गिलमोरने 1975 मध्ये लीड्सच्या मैदानावर 6/14 घेतले होते, त्यानंतर बुमराह आता चौथ्या क्रमांकावर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.