मुंबई, 24 नोव्हेंबर: दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे कमल हसन. साऊथ सुपरस्टार असले तरी या अभिनेत्याचे चाहते संपूर्ण भारतात आहे. आता त्यांच्या चाहत्यांना काळजीत टाकणारी एक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कमल हसन यांची प्रकृती खालावली आहे. नुकतंच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साऊथ सुपरस्टार कमल हसन यांची प्रकृती बिघडली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कमल हसन यांना बुधवारी खूप ताप आला होता, त्यानंतर त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चाचण्यांनंतर डॉक्टरांनी अभिनेत्याला पुढील काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, कमल हसन यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. हेही वाचा - Samantha Ruth Prabhu: तब्येत बिघडल्यानं समंथा रुथ प्रभू हॉस्पिटलमध्ये दाखल? काय आहे सत्य मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमल हसन बुधवारी हैदराबादहून परतत असताना त्यांनी अस्वस्थतेची तक्रार केली होती. त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. पूर्वी ते अस्वस्थ होते आणि थोडा तापही होता. हैदराबादहून परतल्यानंतर लगेचच या अभिनेत्याला चेन्नईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचे बोलले जात आहे.
Tamil Nadu | Actor and Makkal Needhi Maiam chief Kamal Hassan was admitted to Sri Ramachandra Hospital in Chennai last night after he complained of fever.
— ANI (@ANI) November 24, 2022
(File photo) pic.twitter.com/RwSQyIFWip
कामाच्या आघाडीवर बोलायचे झाले तर कमल हसन हे सध्या दिग्दर्शक शंकर यांच्या आगामी ‘इंडियन 2’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ते सध्या ‘बिग बॉस तमिळ’चा सहावा सीझन देखील होस्ट करत आहेत. सतत शूटिंग आणि प्रवासामुळे, कदाचित अभिनेत्याला थोडा ताण आणि थकवा जाणवू लागला होता, ज्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती.
कमल हसनच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचे तर, ते लवकरच ‘इंडियन 2’ चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर दिग्दर्शक मणिरत्नम यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात करणार आहेत. कमल हासन यांचा यावर्षी आलेला ‘विक्रम’ हा चित्रपट चांगलाच गाजला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाईदेखील केली. वृत्तांवर विश्वास ठेवला तर ते येणाऱ्या काळात मणिरत्नम यांच्या ‘केएच 234’ या चित्रपटातही दिसणार आहे.याशिवाय कमल हसनकडे दिग्दर्शक पा रंजित यांचाही एक चित्रपट आहे, ज्याचे कोणतेही अपडेट अद्याप आलेले नाही.