Home /News /entertainment /

प्रियांका चोप्राला होतं दारुचं व्यसन; कॉकटेल पिऊन विमानात झाली होती टल्ली

प्रियांका चोप्राला होतं दारुचं व्यसन; कॉकटेल पिऊन विमानात झाली होती टल्ली

दारु पिऊ नका असं सांगणाऱ्या प्रियाका चोप्रालाच आहे दारुचं व्यसन

    मुंबई 15 एप्रिल: आपलं दिसणं, फिगर आणि अभिनय यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत एक स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. एकेकाळी ती हिंदीतल्या भूमिकांमुळे चर्चेत होती, नंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यामुळे चर्चेत होती त्यानंतर तिनी हॉलिवूडमध्ये पदार्पण(Hollywood)केल्यानंतर तिच्याबद्दल चर्चा झाली. सध्या बाफ्ता म्हणजेच ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन अवॉर्ड्स सोहळ्याच्या सूत्रसंचलनासाठी चर्चेत आहेत. प्रियांकाला 74 व्या बाफ्ता पुरस्कार सोहळ्यात(BAFTA Awards 2021)सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. अशी संधी मिळवणाऱ्या मोजक्या भारतीय कलाकारांमध्ये तिचा नंबर लागतो. प्रियांका जशी यासाठी चर्चेत आहे तशीच ती सोशल मीडियावरही खूप चर्चेत असते. ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमी काहीतरी वेगळं सोशल मीडियावर टाकत असते. तिचा फॅशन सेन्सही जबरदस्त आहे. त्यामुळे तिला ऑनलाइन फॉलोअरही खूप आहेत. सध्या प्रियांकाचा एक किस्सा सोशल मीडियात चर्चिला जातोय. प्रियांकाचा हा किस्सा तिच्या लग्नापूर्वीचा आहे. ती क्वाँटिको या मालिकेत काम केल्यामुळे प्रसिद्ध झाली होती. तेव्हाचा हा किस्सा आहे असं पिंकव्हिलाच्या वृत्तात म्हटलं आहे. एका फ्लाइट अटेंडंटनी (Flight Attendant) रेडइट वेबसाइटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यात प्रियांकाबद्दलचा किस्सा सांगितला होता. नंतर हा व्हिडिओ डिलिट करण्यात आला आणि तो आता ऑनलाइन उपलब्ध नाही. अटेंडंट म्हणाली,‘प्रियांकानं मला बोलावलं आणि ब्लॅक मेरी हे कॉकटेल(Cocktail)मागवलं. त्यासोबत हॉट सॉस पण तिनं मागवलं होतं. प्रियांकानी 3 कॉकटेल ड्रिंक्स घेतली आणि दारुच्या नशेत ती पूर्ण टल्ली झाली होती. मग प्रियांका कुणाशी काहीच बोलली नाही आणि झोपून गेली.’ असा हा किस्सा सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. व्हायरलही होत आहे. सामान्यपणे दारूच्या नशेत माणूस अजब चाळे करतो, दंगा घालतो किंवा मनात कुणाबद्दल काही असेल तर बोलून टाकतो असं घडताना अनेकदा ऐकलं, पाहिलेलं असतं. त्यामुळे प्रियांकानी असं काही केलं का अशी उत्सुकता सगळ्यांच्या मनांत होती पण ती शांत झोपून गेली. नुकत्याच झालेल्या बाफ्ता पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालन करताना प्रियांकाने मँडेरिन कॉलरचं गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं. या जॅकेटची किंमत 3915 युरो म्हणजे 3 लाख 52 हजार 75 रुपये इतकी होती. तिनी या सोहळ्याचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही शेअर केले होते.
    First published:

    Tags: Entertainment, Priyanka chopra

    पुढील बातम्या