मुंबई, 27 मार्च : चीन, इटलीनंतर आता कोरोना व्हायरसनं आता भारतातही थैमान घालायला सुरुवात केली आहे. भारतात आतापर्यंत 17 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 650 पेक्षाही जास्त लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. एकटया मुंबईतील संख्या 50 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे देशभरात आता 21 दिवस लॉकडाउन करण्यात आलं आहे आणि वेळ पडल्यास हा कालावधी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तरीही अनेक ठिकाणी लोक या परिस्थितीला गांभीर्यानं घेत नसल्याचं पाहायला मिळत आहे. लॉकडाउन असताना घराबाहेर पडू नका, घरी राहा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या असं वारंवार सांगूनही अनेकजण घरातून बाहेर पडताना दिसत आहे ज्यांच्यावर पोलिसांना नाइलाजानं लाठीचार्ज करावा लागत आहे. पण एवढ्यानंही लोकांना अक्कल आलेली नाही. अशात सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा मराठी सेलिब्रेटींचा व्हिडीओ सर्वांना नक्कीच विचार करायला लावणारा ठरतो. ‘आम्हाला फरक पडत नाही जोवर आमचं कोणी जात नाही’ अशा टायटलचा हा व्हिडीओ प्रत्येकानं नक्कीच पाहायला हवा. कोरियन वेब सीरिजने 2018 मध्येच केली होती Coronavirus ची भविष्यवाणी, पाहा Video
सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील कलाकार, तंत्रज्ञ आणि कार्यक्रमाची संपूर्ण टीम यांनी मिळून हा व्हिडीओ तयार केला आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचा आणि तुमच्या सुरक्षेसाठी आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसांचा मान राखून तरी सर्वांनी घरी बसून स्वत:चं व देशाचं रक्षण करावं असा संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सर्व कलाकारांनी ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेवर आधारित स्वतःच्या घरीच बसून तयार केला आहे. रामायणातील सीता वयाच्या 64 व्या वर्षींही दिसते ग्लॅमरस, सध्या या कामात असते बीझी कोरोना व्हायरसचा प्रभाव मनोरंजन क्षेत्रावरही पडला आहे. अनेक सेलिब्रेटी त्यांच्या सिनेमांची शूटिंग थांबवून घरी राहिले आहेत आणि आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांनाही घरी राहून स्वतःची काळजी घेण्याचं आणि सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. अशात मराठी सेलिब्रेटींचा हा व्हिडीओ नक्कीच सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरतो. धक्कादायक! Coronavirus दरम्यान 36 वर्षीय अभिनेत्याचं निधन