सध्या देशभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातल्यानं याचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं रामायण हा लोकप्रिय शो पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.
रामायण मालिका सुरू झाली होती त्यावेळी मालिकेतील कलाकरांबद्दल सर्वांनाच एक वेगळं आकर्षण होतं. या मालिकेत सीतेची भूमिका अभिनेत्री दीपिका चिखलिया हीनं साकारली होती.
रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया आता 54 वर्षांची झाली आहे. मात्र या वयातही तिचा फिटनेस उत्तम आहे.
दीपिका सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. ती नेहमीच इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करताना दिसते. मागच्या वर्षी रिलीज झालेल्या बाला सिनेमात दीपिकानं यामी गौतमच्या आईची भूमिका साकारली होती.
रामायणमध्ये सीतेची भूमिका साकारण्याआधी तिनं बऱ्याच सिनेमात काम केलं होतं. ज्यात भगवान दादा, रातके अंधेर में, खुदाई, सुन मेरी लैला, चीख, आशा ओ बालोभाषा आणि नांगल या सिनेमांचा समावेश आहे.
दीपिकानं बिझनेसमन हेमंत टोपीवाला यांच्याशी लग्न केलं. या दोघांना दोन मुली आहेत. ज्यांची नावं निधी आणि जूही अशी आहेत.
दीपिका सध्या पतीच्या कंपनीच्या मार्केटिंग हेड आहे. मोकळ्या वेळेत ती पेंटिंग करते. तिला एक्रॅलिक आणि ऑइल पेंटिंगची आवड आहे.