मुंबई, 27 मार्च : सध्या वेगानं पसरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. हजारो लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. भारतात सध्या या व्हायरसचे 600 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तर 17 लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. या विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेता सरकारनं लॉकडाउनची घोषणा केली आहे. पण नुकताच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात 2018 मध्ये आलेल्या एका कोरियन वेब सीरिजमध्ये कोरोना व्हायरबाबत उल्लेख असल्याचं बोललं जात आहे. नेटफ्लिक्सवर 2018 मध्ये रिलीज झालेल्या My Secret Terrius या वेबसीरिजमध्ये एक जीवघेण्या विषाणूबद्दल सांगण्यात आलं होतं. सध्या या वेब सीरिजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक डॉक्टर बोलताना दिसत आहे की, मोर्टेलिटी रेट 90 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी काही लोक अशाप्रकारचा जीवघेणा व्हायरस बनवत आहेत. धक्कादायक! Coronavirus दरम्यान 36 वर्षीय अभिनेत्याचं निधन
My Secret Terrius, Season 1, Ep.10
— Old School Mausa (@AdvancedMaushi) March 26, 2020
Netflix
Skip to 53 before they pull this down.
This will send a shiver down your spine.#ChineseVirus19
Thanks for the video @akanxabisht! pic.twitter.com/cYBhC3ReAY
सोशल मीडियावर सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडीओमध्ये डॉक्टर सांगतात, जर तुम्ही या व्हायरसच्या संपर्कात आलात तर 5 मिनिटांत हा व्हायरस तुमच्या फुफ्फुसांना नुकसान पोहोचवायला सुरुवात करतो. तसेच या व्हायरसवर अद्याप कोणत्याही प्रकारचं औषध सापडलेलं नाही. हा व्हिडीओ पाहिल्यावर या वेब सीरिजमध्ये 2 वर्षांपूर्वीच कोरोनाची भविष्यवाणी करण्यात आल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. खूशखबर! ‘या’ वेळेत पुन्हा प्रसारित होणार ‘रामायण’, प्रकाश जावडेकर यांची माहिती सोशल मीडियावर सध्या #ChineseVirus19 ट्रेंड करत आहे. या वेबसीरिजचा हा व्हिडीओ शेअर करुन लोक या व्हायरसच्या भविष्यवाणी विषयी बोलताना दिसत आहेत. मात्र या व्हिडीओचं कोणतंही व्हेरीफिकेशन अद्याप मिळालेलं नाही. हिरो नाही सुपरहिरो! कोरोनाग्रस्तांसाठी प्रभासनं केली 4 कोटी रुपयांची मदत