चेन्नई, 27 मार्च : सध्या देशभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं असतानाचा एका अभिनेत्याचं वयाच्या 36 व्या वर्षी निधन झाल्यानं खळबळ उडाली आहे. तमिळ अभिनेता सेथुरामन याचं गुरुवारी रात्री चेन्नई येथे कार्डियक अरेस्टमुळे निधन झालं. त्याच्या निधनामुळे फक्त त्याचे कुटुंबीयच नाही तर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. सेथुरामन 2013 मध्ये आलेल्या रोमँटिक कॉमेडी सिनेमा ‘कन्ना लड्डू थिना आना’ मधून लोकप्रिय झाला होता. सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता सेथुरामन याला रात्री 8.45 ला कार्डियक अरेस्ट अॅटॅक आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अभिनेता सेथुरामन विवाहित होता. त्याला मुलं सुद्धा आहेत. साउथ अभिनेता सतीश आणि अभिनेत्री ऐश्वर्या राजेश यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून सेथुरामनच्या निधनाची माहिती दिली. सतीशनं ट्वीट केलं, ‘सेथुरामनच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं. काही तासांपूर्वीच कार्डियक अरेस्टमुळे सेथुरामन याचं निधन झालं.’ सतीशनं सेथुरामनच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. लॉकडाउन झाल्यानंतर परेश रावल यांनी शोधला Social Distancing चा अर्थ
Sad news. Actor and Doctor Sedhuraman passed away few hours ago due to cardiac arrest. My condolences to his family. RIP pic.twitter.com/SIlkfQ1qm2
— Sathish (@actorsathish) March 26, 2020
अभिनेता सेथुरामननं काही दिवसांपूर्वीच COVID-19 च्या जागतिक प्रसाराबाबत बोलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ‘कन्ना लड्डू थिना आना’ या सिनेमाव्यतिरिक्त सेथुरामननं ‘वलीबा राजा’ (2016), ‘सक्का पोडु पोडु राजा’ (2017) आणि ‘50/50’ (2019) या सिनेमांत काम केलं होतं. Lockdown 21 Days : रिंकू सध्या काय करते माहित आहे का? पाहा VIDEO तोंडाला प्लास्टिक बांधून अभिनेत्रीनं केलं असं काही की, VIDEO पाहून उडेल थरकाप