मुंबई, 5 जून : लॉकडाऊनमध्ये प्रवासी मजूर, विद्यार्थी आणि गरजूंना मदत करणारा अभिनेता सोनू सूदनं खुलासा केला आहे की, त्याच्या नावावर काही लोक मजूरांकडून पैसे घेत आहेत. सध्या सोनू सूद प्रवासी मजूर, विद्यार्थी आणि गरजूंना स्वतःकडून शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांच्या मदतीसाठी त्यानं टोल फ्री हेल्पलाइन नंबर सुद्धा सुरू केला आहे. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून तो लोकांची मदत करत आहे. सोनूनं त्याच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून काही अशा लोकांचे मेसेज स्क्रीनशॉट शेअर केले आहेत जे त्याच्या नावावर या प्रवासी मजूरांना त्यांच्या घरी सोडण्याच्या बहाण्यानं पैसे वसूल करत आहे. या फ्रॉड लोकांच्या मेसेजचे स्क्रीनशॉट आपल्या ट्विटरवर शेअर करत सोनूनं सर्वांना सावध केलं आहे. त्यानं अशा लोकांच्या बोलण्यात न अडकण्याचं आवाहन करत आपण देत असलेली सुविधा ही पूर्णपणे निशुल्क असल्याचं सुद्धा सांगितलं आहे. ‘तु माझ्यासोबत नेहमीच…’ वाजिद खानसाठी भाऊ साजिदची भावुक पोस्ट
सोनू सूदनं त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं, मित्रांनो काही लोक तुमच्या गरजेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते तुमच्याशी त्यासाठी संपर्क करतील. जी सेवा मी श्रमिकांना देत आहे. त्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलेलं नाही. जर कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे माझ्या नावाने पैसे मागत असेल तर त्याला पैसे देऊ नका. लगेच आम्हाला कळवा किंवा जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करा. या आधीही अशा खोट्या लोकांपासून सावध राहण्याचं आवाहन सोनूनं केलं होतं. भयानक होता सनी लिओनीचा फर्स्ट KISS चा अनुभव, वडिलांनी रंगेहात पकडलं आणि… सोनू सूद बॉलिवूडच्या त्या कलाकारांपैकी एक आहे जो कोरोनाच्या या लढाईमध्ये गरजू, प्रवासी मजूर आणि विद्यार्थी यांनी शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. सोनू स्वखर्चानं बस आणि ट्रेनच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम मागच्या काही दिवसांपासून करताना दिसत आहे. त्याच्या या कामाचं कौतुक केवळ सामान्य लोकच नाही तर बॉलिवूड कलाकार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही केलं आहे. DDLJ चा ‘पलट’ सीन आहे हॉलिवूड सिनेमाची कॉपी, विश्वास नाही बसत तर हा घ्या पुरावा!