मुंबई, 4 जून : बोल्डनेस आणि बिनधास्त स्वभावामुळे बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी सनी लिओनी नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सध्या कोरोना संक्रमणाच्या काळात ती पती आणि मुलांसह अमेरिकेत आहे. मात्र तिच्यासंबंधीत जुने कस्से सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहेत. अडल्ट फिल्ममधून आपल्या करिअरची सुरुवात करण्याऱ्या सनीला तिच्या खासगी आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं आहे. दरम्यान बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत तिनं तिच्या फर्स्ट किसचा अनुभव शेअर केला होता. आपल्या बोल्ड अंदाजानं सर्वांना घायाळ करणाऱ्या सनीसाठी बॉलिवूडमध्ये येणं आणि इथे टिकून राहणं म्हणजे सुद्धा मोठं दिव्य होतं. कारण अडल्ट इंडस्ट्रीचा तिची पार्श्वभूमी पाहता तिला इथे खूपच वाईट वागणूक मिळाली. पण सनीनं तिच्या वेबसीरिजमध्ये तिचा जीवनप्रवास एका खुल्या पुस्तकाप्रमाणं सर्वासमोर मांडला आणि लोकांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण काही अंशांनी बदलला. या वेबसीरिजच्या प्रमोशनच्या वेळी दिलेल्या एका मुलाखतीत सनीनं तिच्या फर्स्ट किसचा अनुभव शेअर केला. जो तिच्यासाठी खूपच वाईट होता. कारण असं करताना तिला तिच्या वडिलांनीच पाहिलं आणि त्यावरुन त्यांनी तिला चांगलंच सुनावलं होतं. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्रीनं लॉकडाऊनमध्येच उरकलं लग्न, पाहा PHOTOS
सनीनं सांगितलं, हे घडलं तेव्हा मी शाळेत होते. त्यावेळी मी माझ्या बॉयफ्रेंडला पहिल्यांदाच किस केलं होतं आणि त्यावेळी माझ्या वडीलांनी मला असं करताना पाहिलं. त्यानंतर त्यांनी मला खूप सुनावलं आणि घरी घेऊन आले. त्यानंतर घरी जो हंगामा झाला तो वेगळा. सनी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि ती नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिची वेब सीरिज ‘करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी’मधून तिच्या आयुष्यातले अनेक खुलासे झाले आहेत. DDLJ चा ‘पलट’ सीन आहे हॉलिवूड सिनेमाची कॉपी, विश्वास नाही बसत तर हा घ्या पुरावा!
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सनीनं तिच्या लव्ह लाइफबद्दल एक धक्कादायक खुलासा केला होता. तिनं या मुलाखतीत सांगितलं की, जेव्हा मी आणि डॅनिअल पहिल्यांदा भेटलो होतो. त्यावेळी त्यानं मला लेस्बियन समजलं होतं. कारण मी त्यावेळी माझ्या मैत्रीणीसोबत होते. जी लेस्बियन होती आणि तिनं माझा हात पकडला होता. सनी आणि डॅनिअलनं जवळपास 2 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2011 मध्ये लग्न केलं आहे. COVID-19 रिलीफ फंडसाठी अभिनेत्रीचा मोठा निर्णय, NUDE फोटोचा करणार लिलाव