'तु माझ्यासोबत नेहमीच...' वाजिद खानसाठी भाऊ साजिदची भावुक पोस्ट, वाचून येईल डोळ्यात पाणी

'तु माझ्यासोबत नेहमीच...' वाजिद खानसाठी भाऊ साजिदची भावुक पोस्ट, वाचून येईल डोळ्यात पाणी

वाजिदच्या आठवणीत भाऊ साजिद यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहिली आहे. जी सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 5 जून : बॉलिवूडची प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर जोडी साजिद-वाजिदचे वाजिद खान यांचं मागच्या रविवारी म्हणजेच 31 मे ला रात्री उशीरा निधन झालं. किडनीच्या आजारानं त्रस्त असलेल्या वाजिद यांना कोरोना संक्रमण सुद्धा झालं होतं. ज्यामुळे त्यांचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन झालं. वाजिद यांच्या अशा अचानक जाण्यानं फक्त बॉलिवूडच नाही तर देशभरातील लोकांना धक्का बसला. सध्या त्यांच्या आईलाही कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्याचं समजतं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशात वाजिद यांचा भाऊ साजिद यांना आपल्या भावाची खूप आठवण येत आहे. वाजिदच्या आठवणीत त्यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहिली आहे. जी सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे.

भाऊ वाजिद खानसाठी साजिद यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं, 'मेरी जान मेरा ईमान हां मेरी शान तुझपे मेरी जिंदगी कुर्बान मेरे भाईजान. चाहत्यांच्या आठवणीत तु नेहमीच राहशील. तु माझ्यासोबत नेहमीच चालत राहशील. आम्हाला तुझी खूप आठवण येते वाजिद.

चक्रीवादळामुळे संसार उघड्यावर; रिअल हिरो सोनू सूद धावला यांच्याही मदतीला

याआधीही साजिद यांनी वाजिद खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यात ते हॉस्पिटलमध्ये असतानाच पियानो वाजवताना दिसत होते. हा व्हिडीओ शेअर करताना साजिद यांनी लिहिलं, तू ही दुनिया सोडलीस, सर्व काही संपलं, पण तू कधीच म्युझिक सोडलं नाही आणि म्युझिकनं तुला कधी सोडलं नाही. माझा भाऊ एक लेजेंड आणि लेजेंड कधीच मरत नाही. मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करेन. माझ्या आनंदात, माझ्या प्रार्थनेत आणि माझ्या नावात तु कायम असशील.

SHOCKING! कास्टिंग डायरेक्टर क्रिष कपूरचं वयाच्या 28 व्या वर्षी निधन

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्रीनं लॉकडाऊनमध्येच उरकलं लग्न, पाहा PHOTOS

First published: June 5, 2020, 7:38 AM IST

ताज्या बातम्या