मुंबई, 4 जून : शाहरुख खान आणि काजोल यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा हिंदीतला एक जबरदस्त रोमँटिक सिनेमा मानला जातो. 1995 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाला त्यावेळी प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. दिग्दर्शक आदित्य चोप्रांनं या सिनेमातू आपल्या दिग्दर्शनाच्या करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमातील डायलॉग त्यावेळीच प्रचंड गाजले आणि आजही त्यांची क्रेझ तरुणाईमध्ये दिसतेच. यापैकीच शाहरुख खानचा एक डायलॉग होता 'पलट' जो प्रचंड गाजला. पण हा डायलॉग आणि संपूर्ण सीन हा एक हॉलिवूड सिनेमातील कॉपी असल्याचं समोर आलं आहे.
शाहरुख खान आणि काजोल यांचा सुपरहीट सिनेमा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'मधला 'पलट' हा असा एक डायलॉग असा होता जो खूप गाजला आणि आजही या डायलॉगची क्रेझ कमी झालेली नाही. जो प्रत्येकाच्या तोंडी आजही आहे. पण हा आयकॉनीक सीन आणि डायलॉग एक हॉलिवूड सिनेमातून कॉपी करण्यात आला होता. हा तो सीन आहे जेव्हा शाहरुख काजोल म्हणजेच सिमरनला म्हणतो, पलट... पलट... आणि ती मागे वळून पाहते.
प्रियांका चोप्राच्या बहिणीला बलात्काराची धमकी, ज्यूनिअर एनटीआरशी आहे याचा संबंध
शाहरुख आणि काजोलचा हा लोकप्रिय डायलॉग 1993 मध्ये रिलीज झालेल्या 'इन द लाइन ऑफ फायर' सिनेमातून कॉपी करण्यात आला आहे. सध्या या ओरिजिनल सिनेमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
वोल्फगँग पीटरसनच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात क्लिंट ईस्टवुडच्या भूमिकेत फ्रँक होरिगन आणि रेनी रूसो या लिली रेनच्या भूमिकेत दिसल्या होत्या. या सीनमध्ये दोघंही वॉशिंगटन डीसीच्या लिंकन मेमोरिअलमध्ये एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. काही वेळानं लिली उठते आणि तिथून निघून जाते. फ्रँक तिला पाहत राहतो आणि मनातल्या मनात म्हणतो, 'जर तिनं मागे वळून पाहिलं तर तिला मी आवडलो आहे. चल आता पाहा बरं माझ्याकडे एकदा.' लिली मागे वळून पाहते आणि फ्रँक तिच्याकडे पाहून हसत असतो.
खास गोष्ट अशी की DDLJ चे दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी स्वतः या गोष्टीचा स्विकार केला आहे की, तो स्वतः हॉलिवूड सिनेमापासून खूप प्रभावित आहे. आदित्य चोप्राचं पुस्तक आदित्य चोप्रा रिलीव्समध्ये त्यानं ही गोष्ट मान्य केली आहे. त्यानं सांगितलं, एकदा एक सीन माझ्या डोक्यात घोळत राहिला होता. काही दिवसांनी मी तो सीन विसरलो पण जेव्हा मी DDLJ वर काम करायला सुरुवात केली तेव्हा तो सीन पुन्हा आठवला आणि मी तो त्या सिनेमात वापरला.
दोन वेळा घटस्फोट आणि सिंगल मदर, तिसऱ्यांदा प्रेमात पडलीय श्वेता तिवारी
कोरोनानंतर आता चक्रीवादळ; कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी असं काम केलं नसेल! मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.