मुंबई, 15 मार्च : बॉलिवूडचा अभिनेता सोनू सुदचं नाव सामान्य लोकांमध्ये चांगलंच परिचित आहे. पण सामान्य लोकांसाठी जरी तो हिरो असला तरी मोठ्या पडद्यावर मात्र त्याने अधिक करून खलनायकाच्याच भूमिका साकारल्या आहेत. त्यातीलच एक गाजलेली भूमिका म्हणजे सलमान खान स्टारर 'दबंग'. या चित्रपटातील 'छेदी सिंग' हि भूमिका आहे. सलमान खानचा 'दबंग' चित्रपट एकेकाळी चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील सोनू सूदची 'छेदी सिंग' ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. पण आधी सोनू सूदने स्वतः या चित्रपटासाठी नकार दिला होता. या गोष्टीचा खुलासा त्याने स्वतः केला आहे. काय होतं त्यामागचं कारण जाणून घ्या.
स्मिता प्रकाशच्या पॉडकास्टमध्ये सोनू सूदने 'दबंग' या सुपरहिट चित्रपटाला नकार दिल्याबद्दल सांगितले. याविषयी स्मिताने सोनूला विचारले की तू सलमानसोबत स्क्रीन शेअर करणार आहेस हे तुला माहीत होते का? चित्रपटाचा संपूर्ण फोकसही सलमानवरच असणार होता म्हणून तुम्ही आधी ही भूमिका नाकारली होती का, त्यामुळे सेटवर तुझं आणि सलमानचं यावरून काही भांडण झालं होतं का? असं विचारण्यात आलं.
Ankita Lokhande: अंकिता लोखंडेला मिळत नाहीये काम; व्यथा मांडत म्हणाली, ' मी कामासाठी भीक मागणार…'
यावर उत्तर देताना सोनू म्हणाला, 'माझा एक अंदाज असा होता की, चित्रपटात सलमानच्या 21 भूमिका आहेत हे ठीक आहे, पण त्याच चित्रपटात माझ्याही 19 भूमिका आहेत, ज्या मी करणार आहे'. त्यामुळे या चित्रपटात काम करणं माझ्यासाठी सोपं झालं.
यानंतर सोनू सूदने या भूमिकेला नकार देण्याचं कारण सांगितलं. तो म्हणाला कि, 'जेव्हा स्क्रिप्ट माझ्याकडे आली, तेव्हा पात्र खूप रागीट होते, मी तुझा जीव घेईन, तुला मारून टाकेन असं सतत वागणारी ही भूमिका होती. पण मग मी यात जरा बदल केला. मी स्क्रिप्टमध्ये बदल करत अनेक प्रसंग पुन्हा लिहिले. या पात्राला जरा विनोदी ढंगाने पुन्हा लिहिलं. 'भैय्या जी स्माईल' टाईप कॅरेक्टर ठेवलं, बोलण्याची पद्धत थोडी बदलली आणि अशा प्रकारे मी कॅरेक्टरमध्ये बरेच बदल करून ही भूमिका साकारली. पण या चित्रपटात सलमानची भूमिका पूर्णपणे वेगळी होती. माझ्यात आणि त्याच्यात भांडण का असेल? चित्रपटाचे शूटिंग छान झाले आणि दरम्यान आमची मैत्रीही घट्ट झाली.
संवादादरम्यान सोनूला विचारण्यात आले की, त्याने लॉकडाऊन दरम्यान सामान्यांसाठी जे काही केले त्यामुळे त्याची प्रतिमा लोकांच्या नजरेत बदलली आहे. त्याला राजकारणात नशीब आजमावायचे आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, 'मला मोठ्या पडद्यावरही अनेक राजकीय भूमिका ऑफर करण्यात आल्या आहेत, पण मला त्या करण्यात रस नाही किंवा कोणत्याही पक्षात जाण्यात रस नाही. मला माझे स्वतःचे नियम बनवायचे आहेत. याचवेळी सोनू सूदने त्याला दोनदा राज्यसभेची ऑफर देण्यात आली आहे. असेही सांगितले. तो म्हणाले, 'मी स्वीकारले नाही. मोठमोठी पदेही देण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रीपदही देऊ केले आहे. बर्याच गोष्टी ऑफर केल्या आहेत, परंतु मला त्यात रस दिसत नाही.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Salman khan, Sonu Sood