Ankita Lokhande: अंकिता लोखंडेला कोणी देत नाहीये काम; व्यथा मांडत म्हणाली, ' मी कामासाठी भीक मागणार…'
पवित्र रिश्ता मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. तिने आतापर्यंत 'एक थी नायक', 'झलक दिखला जा 4' आणि 'पवित्र रिश्ता 2.0' सह अनेक शोमध्ये काम केले आहे. एवढंच नाही तर या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. तिने कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले त्यानंतर ती 'बागी 3' मध्ये दिसली होती. पण आता अंकिताने तिला इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याचा खुलासा केला आहे.
अंकिता लोखंडे ही एक गुणी अभिनेत्री आहे. 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय शोमधून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती आजही घराघरात ओळखली जाते.
2/ 8
पण आता अंकिता लोखंडेने 'मणिकर्णिका'नंतर तिला कामासाठी धडपड करावी लागत आहे. तिला काम मिळत नाहीये असा खुलासा केला आहे.
3/ 8
अंकिता लोखंडेने बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'असे कधीच नव्हते की मला खूप स्क्रिप्ट्स मिळत होत्या आणि मी त्या सोडल्या होत्या. बाहेरचं जग वेगळं आहे. कोणीतरी तुमच्यासाठी स्क्रिप्ट घेऊन येत असतं.'
4/ 8
अंकिता लोखंडे पुढे म्हणाली कि, 'मी लोकांकडे जाऊन त्यांना गोड बोलून काम मागू शकत नाही. मी ते करू शकत नाही. माझ्याकडे जे काही येत आहे ते मी मनापासून करत आहे.'
5/ 8
अभिनेत्री पुढे म्हणाली कि, 'मी लोकांकडे काम मागायला जाऊ शकत नाही. लोकांकडे माझ्या टॅलेंटची कदर करायला वेळ नाही.'ती म्हणाली, 'जिथे माझ्या कामाचा सन्मान होत आहे असे मला वाटेल. तिथेच मी काम करेन.' असं म्हणत अंकिताने तिची व्यथा मांडली आहे.
6/ 8
अंकिताच्या मणिकर्णिका चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. पण आता तिला काम मिळत नसल्याच्या खुलाश्याने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
7/ 8
अंकिता लोखंडेने तिच्या पहिल्याच शो 'पवित्र रिश्ता'ने घराघरात आपली ओळख निर्माण केली होती. तिने या शोमध्ये अर्चनाची भूमिका साकारली होती. त्याची सुशांत सिंग राजपूतसोबतची केमिस्ट्री खूप आवडली होती.
8/ 8
अंकिता लोखंडेने 2021 मध्ये विकी जैनसोबत लग्न केले. लग्नानंतर तिने पतीसोबत 'स्मार्ट जोडी' या सेलिब्रिटी रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आणि ती विजेती ठरली. आता तिला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.