मुंबई,13 जानेवारी- दिवसेंदिवस कोरोनाचा (Coronavirus) विळखा घट्ट होत चालला आहे. मनोरंजनसृष्टीतसुद्धा एकपाठोपाठ कलाकरांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. आज मराठी मालिका ‘माझा होशील ना’ (Maza Hoshil Na) फेम अभिनेत्री गौतमी देशपांडेला (Gautami Deshpande) कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियाद्वारे सर्वांना याची कल्पना दिली आहे. शिवाय तिने चाहत्यांना खास सल्लासुद्धा दिला आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडेनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही वेळेपूर्वी एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये गौतमीनं आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने स्टोरीमध्ये म्हटलं आहे, ‘शेवटी कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही मला कोरोनाची लागण झालीच. त्यामुळे कृपा करून नागरिकांनी या परिस्थितीला हलक्यात घेऊ नका. कारण ही वेळ खरंच खूप कठीण आहे. त्यामुळे सर्वांनी योग्य ती काळजी घ्या’. गौतमी पुढं म्हणाली, ‘सर्वांनी आपल्या कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण करा. परंतु त्यानंतरसुद्धा गाफील राहू नका. कारण दोन डोस पूर्ण करूनसुद्धा कोरोनची लागण होऊ शकते. आणि त्याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो ‘. असं म्हणत गौतमीने सर्वांना मोलाचा सल्ला दिला आहे. गौतमी देशपांडे ही मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे. बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत गौतमी या क्षेत्रात आली आहे. गौतमीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेने गौतमीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. या मालिकेत ती सईच्या रूपात महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहे. मालिकेतील सई आणि आदित्यची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच पसंत होती. काही दिवसांपूर्वी या मालिकेने आपला निरोप घेतला आहे. परंतु तरीसुद्धा चाहते सई आणि आदित्यची आठवण काढत असतात. (हे वाचा:
श्रेयस तळपदेसह छोट्या परीलाही लागले ‘पुष्पा’चे वेड, VIDEO VIRAL
) गौतमी देशपांडे स्पशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे नवनवीन फोटोशूट नेहमीच चर्चेत असतात. शिवाय गौतमीला गाण्याची प्रचंड आवड आहे. अभिनेत्री सतत आपल्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहतेही तिला उदंड प्रतिसाद देत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.