Home /News /entertainment /

'या' ब्लॉकबस्टर चित्रपटात सलमान खान नव्हे तर पीयूष मिश्रा होते मुख्य अभिनेता, परंतु....

'या' ब्लॉकबस्टर चित्रपटात सलमान खान नव्हे तर पीयूष मिश्रा होते मुख्य अभिनेता, परंतु....

कसदार अभिनेता, गायक, संगीतकार, कवी अशा विविध भूमिका जोरकसपणे वठवणारे अभिनेते पीयूष मिश्रा यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त जाणून घे?

    मुंबई, 13 जानेवारी-    प्रसिद्ध कलावंत पीयूष मिश्रा  (Happy Birthday Piyush Mishra)  यांची ओळख फक्त अभिनेता म्हणूनच मर्यादित नाही तर ते लेखक, संगीतकार आणि गायकही आहेत. चित्रपटात अगदी विशेष भूमिका करताना त्यांना प्रेक्षकांनी नेहमीच पाहिलं आहे. त्यामुळे त्यांची ओळख अन्य अभिनेत्यांपेक्षा एकदम वेगळी आणि अगदी खास आहे. पीयूष मिश्रा यांची कविता किंवा शायरी म्हणण्याची शैलीही एकदम हटके आहे. याच स्टाईलमुळे ते तरुणांमध्ये भरपूर लोकप्रिय आहेत. आज त्यांचा वाढदिवस   (Piyush Mishra Birthday) आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या जीवनाशी निगडित काही गोष्टी... पीयूष मिश्रा यांचा जन्म 13 जानेवारी 1963 रोजी मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये झाला. अगदी लहानपणापासूनच त्यांना साहित्यात रुची होती. मीडिया रिपोर्टनुसार नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून (NSD) पदवी घेतल्यानंतर त्यांनी स्वत:चा एक थिएटर ग्रुप सुरु केला होता. जवळपास 20 वर्षं दिल्लीत काम केल्यानंतर ते मुंबईत आले. ‘मैंने प्यार किया’ या सुपरडूपर हिट चित्रपटात मुख्य नायकाच्या भूमिकेत पीयूष मिश्रा झळकणार होते. म्हणजे सलमान खानऐवजी भाग्यश्रीसोबत पीयूष मिश्रा दिसले असते. पण सूरज बडजात्यांनी सलमान खानला या भूमिकेसाठी निवडलं. त्याचवेळेस रातोरात पीयूष मिश्रा प्रचंड लोकप्रियही झाले असते. पण कदाचित तसं घडायचं नव्हतं. त्यानंतर पीयूष मिश्रा यांनी ‘दिल से’ (Dil Se) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी एका सीबीआय इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. चित्रपटांत विविध भूमिका ते करत असले तरी थिएटर त्यांचं पहिलं प्रेम आहे. अभिनयाशिवायही पीयूष मिश्रा यांची एक गीतकार, कवी म्हणूनही ओळख आहे. त्यांनी लिहिलेली काही गाणी तरुणांमध्ये तर प्रचंड लोकप्रिय आहेत. यामध्ये ‘गुलाल’ (Gulal) चित्रपटातील ‘आरंभ है प्रचंड’, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ चित्रपटातील ‘आबरु’ ही गाणी तरुणांची खास आवडती आहेत. राजकुमार संतोषींच्या ‘ दी लिजेंड ऑफ भगतसिंह’ या चित्रपटाचे संवाद त्यांनी लिहिले होते. विशाल भारद्वाज यांच्या 2003 मध्ये आलेल्या ‘मकबूल’ चित्रपटातील ‘काका’ च्या भूमिकेमुळे पीयूष यांनी अनेकांची मनं जिंकली होती. पीयूष मिश्रा यांना गाण्याचीही आवड- पीयूष मिश्रा यांनी ‘ब्लॅक फ्रायडे’ या चित्रपटासाठी ‘रुक जा रे बंदे’ हे गाणं लिहीलं होतं. हे गाणं बॉलिवूडमधल्या लोकप्रिय गाण्यांमधलं एक आहे. अशा एकापेक्षा एक सरस गाणी लिहिल्यामुळेच बॉलिवूडमध्ये त्यांची ओळख फक्त अभिनेता म्हणून नाही तर एक यशस्वी गीतकार म्हणूनही आहे. त्यांनी थिएटरमद्येही बरंच काम केलं आहे. इतकंच नाही तर त्यांना गाण्याचीही खूप आवड आहे. आपल्या हरहुन्नरी अभिनेता, गीतकाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
    First published:

    Tags: Bollywood actor, Entertainment

    पुढील बातम्या