मुंबई, 26 मार्च : गुढीपाडव्याला मराठी नववर्षाची सुरुवात होते. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे कोणालाही नव्या वर्षाचं स्वागत नेहमीप्रमाणे जल्लोषात करता आलं नाही. गुढीपाडव्याच्या निमित्तानं अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. पाडव्या एक दिवस आधीच देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. यावर बोलताना लॉकडाउनमध्ये गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन ही तर विडंबना आहे असं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सोनाली बेंद्रेनं मराठमोळ्या लुकमधील तिचा एक थ्रोबॅक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा… ही खरं तर विडंबना आहे की नव्या वर्षाची सुरुवात 21 दिवसांच्या लॉकडाउननं करावी लागत आहे. पण हा कोणत्या ना कोणत्या स्वरुपातला संकेत आहे की आता आपल्याला नक्की काय करण्याची आवश्यकता आहे. तोंडाला प्लास्टिक बांधून अभिनेत्रीनं केलं असं काही की, VIDEO पाहून उडेल थरकाप
सोनालीनं तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, आत्मपरिक्षण करा आणि भविष्याकडे पाहा. गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो. हिंदू कॅलेंडर प्रमाणे या दिवशी नव्या वर्षाची सुरुवात होते. सध्या जगाला कोरोना व्हायरसच्या गंभीर आजारानं विळखा घातला आहे. ज्याचा फटका सध्या भारताला ही बसताना दिसत आहे. अशात गुढीपाडव्याच्या निमित्तानं सोनालीनं तिचा मराठमोळा लुक शेअर केला. ज्यात ती नऊवारी साडीत दिसत आहे. मोनोलॉगनंतर आता Coronavirus वर कार्तिकचं नवं रॅप साँग, पाहा Video
सोनाली बेंद्रे मागच्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. मागच्या वर्षी कॅन्सरवर उपचार घेत असतानाही सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. सोनाली बॉलिवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री मानली जाते. तिनं 1994 मध्ये रिलीज झालेल्या ‘आग’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिनं ‘सरफरोश’, ‘हम साथ साथ है’, ‘कल हो ना हो’ यासारखे बरेच सुपरहिट सिनेमे दिले. सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहे अभिनेत्री, टेलर मिळाला नाही तर स्वतःच शिवले पडदे