मुंबई, 26 मार्च : कोरोना व्हायरसमुळे सध्या बॉलिवूडचे सर्वच कलाकार सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहे. अनेक कलाकारांच्या सिनेमाच्या रिलीज डेट पुढे ढकलल्या गेल्या आहेत तर काहींनी त्यांच्या सिनेमांचं शूटिंग थांबवलं आहे. घरी मेड येत नसल्यानं त्यांना स्वतःची काम स्वतःलाचं करावी लागत आहेत. भांडी घासण्यापासून ते फरशी पुसेपर्यंत अनेक सेलिब्रेटींचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका बॉलिवूड अभिनेत्रीचा पडदे शिवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत राहणारी अभिनेत्री नीना गुप्ता सध्या सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहेत. अशात त्यांचा कपडे शिवतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. नीना यांनी स्वतःच हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात त्या खिडकीचे पडदे शिवताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी टेलरला घरी बोलवू शकत नसल्यानं स्वतःच शिवणकाम करत असल्याचं सांगितलं आहे. BOLD लुकमध्ये दिसली रणबीर कपूरची हिरोइन, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा
नीना गुप्ता यांनी हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, अरे यार कच्ची हो गई सबके सामने. यासोबतच त्यांनी शाळेत असताना होम सायन्सच्या क्लासमध्ये शिवणकाम शिकल्याची माहिती दिली. नीना गुप्ता यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिवर खूपच व्हायरल होत आहे. युजर्स यावर कमेंट करताना दिसत आहेत. Coronavirus मुळे हॉस्पिटल्स कमी पडलीत तर काय? बिग बींनी शेअर केली आयडिया नीना यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर काही दिवसांपूर्वी आयुष्मान खुरानाच्या शुभ मंगल ज्यादा सावधान या सिनेमात दिसल्या होत्या. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. याशिवाय कंगानाच्या पंगामध्ये त्यांनी तिच्या आईची भूमिका साकारली होती. लवकरच त्या नेटफ्लिक्सवरील शो ‘मसाबा मसाबा’मध्ये आपल्या मुलीसोबत दिसणार आहेत. हृतिकच्या घरी रहायला आली EX Wife, कोरोनाचा असाही परिणाम