Home /News /entertainment /

अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं OTTवर दमदार पदार्पण; The Broken News प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं OTTवर दमदार पदार्पण; The Broken News प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं OTTवर दमदार पदार्पण; The Broken News प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं OTTवर दमदार पदार्पण; The Broken News प्रेक्षकांच्या भेटीला

सुष्मिता सेन (Sushmita Sen) रविना टंडन (Raveena Tandon) माधुरी दीक्षितनंतर (Madhuri Dixit) आता अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. 'द ब्रोकन न्यूज' (The Broken News) ही वेब सीरिज येत्या 10 जूनला प्रदर्शित होत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 08 जून: बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं ( Sonali Bendre) प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची पाडलेली छाप आजही कामय आहे. सोनालीनं मोठा पडदा गाजवल्यानंतर मी आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण (Sonali Bendre OTT Debut) करण्यास सज्ज झाली आहे. 'ब्रोकन न्यूज' (Broken News) या ओटीटी सीरिजच्या माध्यातून सोनाली आपल्याला झी5 ( Zee 5) वर दिसणार आहे.  सोनाली सध्या तिच्या या नव्या सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 10 जूनला सीरिज प्रदर्शित होणार आहे. 'प्रमोशन डे', असं म्हणत सोनालीनं तिचे प्रमोशनमधील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर  केले आहेत. अमिना कुरेशी (Amina Qureshi) ही व्यक्तिरेखा सोनाली सीरिजमध्ये साकारताना दिसणार आहे.  एक दमदार न्यू अँकर, तडफदार पत्रकाराच्या भूमिकेत सोनाली दिसणार आहे.  'मै अमिना कुरैशी और आप देख रहे आवाज भारती न्यूज', अशी सोनालीची दमदार एंट्री सीरिजच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. तेव्हापासूनत सीरिज पाहण्याची उत्सुकता सोनालीच्या चाहत्यांना लागून आहे. सोनालीची ही सीरिज 'प्रेस' या ब्रिटीश सीरिजचं हिंदी रुपांतर आहे. सोनालीसह सीरिजमध्ये अभिनेते जयदीप अहलावत, श्रिया पिळगावकर, इंद्रनील सेनगुप्ता, तारुक  रैना, आकाश खुराना आणि किरण कुमार प्रमुख भूमिकेत आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by ZEE5 (@zee5)

  'प्रामाणिक,सत्याच्या बाजूने असणारी आणि फुलटाईम बॉस लेडी! अमिना कुरेशीचा प्राइम टाइमचा शो', असं म्हणतं सोनालीनं सीरिजचा प्रोमो शेअर केला आहे. हेही वाचा - करीनानं घातला 40 हजारांचा T- Shirt अन् मग जे घडू नये तेच घडलं! मागच्या काही काळात बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रेटींनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि रवीना टंडन (Raveena Tandon)  यांच्यानंतर अनेक कलाकारांनी ओटीटीवर हजेरी लावली आङे. सुष्मिता सेनची 'आर्या' (Aarya) ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आर्याचा दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर अभिनेत्री रवीना टंडनने 'अरण्यक'मधून (Aranyak) ओटीटीवर पदार्पण केलं.  तसंच अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit OTT Debut) अजय देवगण (Ajay Devgan OTT Bedut) यांनीही ओटीटीवर दमदार एंट्री घेतली आहे. आता अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या ओटीटी पदार्पणाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. जून महिन्यात 'द ब्रोकन न्यूज'सह, 'शी सीझन 2', 'रनवे 34', 'अर्ध' , 'कोड एम सीझन 2',  'मिस मार्वल 'हे सिनेमे आणि वेब सीरिजच्या प्रदर्शित होणार आहेत.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, OTT

  पुढील बातम्या