करिनानं या लुकबरोबर ब्लॅक सनग्लासेसही लावले होते. हातात कॉफी ग्लास पकडून बाहेर येताच करिना पापाराझींच्या समोर आली.
करिनाच्या कॅज्युअल आऊटफिट आणि फ्लॅट फुटवेअरमधल्या तिच्या स्पोर्टी लुकनं आणि त्यातही तिच्या टी शर्टनं सर्वांचं लक्ष वेधलं.
आता तुम्ही म्हणालं येल्लो टी शर्टमध्ये एवढ काय? करिनानं घातलेल्या टी शर्टची किंमत ही 40 हजार आहे. ही किंमत वाचून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
करीनाचा हा महागडा लुक तिला नेटिझन्सच्या काही पसंतीस उतरला नाही. तिच्या टी-शर्टवरुन तिला ट्रोल करण्यात आलं.
करीनाच्या फोटोवर कमेंट करत 'आमच्याकडे 200 रुपयाला याहून चांगला टी-शर्ट मिळतो', असं म्हणत करीनाला चांगलचं ट्रोल केलं.