‘सेक्स’वर बोलणार सोनाक्षी सिन्हा, ट्विटरवर शेअर केला नंबर

सोनाक्षीनं तिच्या ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 02:22 PM IST

‘सेक्स’वर बोलणार सोनाक्षी सिन्हा, ट्विटरवर शेअर केला नंबर

मुंबई, 25 जुलै : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या ता आगामी सिनेमा ‘खानदानी शफाखाना’मुळे चर्चेत आहे. या सिनेमात ती एक सेक्स क्लिनिक चालवताना दिसणार आहे. हा सिनेमा यातील काही सीन्समुळे वादात अडकला आहे. सध्या सोनाक्षीनं या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अशी कंबर कसली आहे की, तिनं आपल्या ट्विटर अकाउंटचं नाव बदलून बेबी बेदी असं केलं आहे. यासोबतच तिनं लोकांना गप्प न राहता सेक्स या विषयावर मनमोकळेपणानं बोलण्याचा सल्ला दिला आहे. हा सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. हलक्या फुलक्या विनोदी संवादातून हा सिनेमा सेक्स या विषयावर भाष्य करताना दिसणार आहे.

सोनाक्षीनं तिच्या ट्विटरवर याच सिनेमाच्या प्रमोशनसंबंधी एक पोस्ट केली आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सोनाक्षीनं लिहिलं, आता गप्प बसू नका, बोलायला सुरुवात करा, अधिक माहितीसाठी मिस कॉल द्या 91 7069588444 वर. सोनाक्षीनं हे ट्विट 24 जुलैला रात्री उशीरा केलं होतं मात्र तिनं शेअर केलेल्या या नंबरमुळे सध्या हे ट्वीट खूप चर्चेत आहे.

धक्कादायक ! डोक्याला गंभीर इजा झाल्यानं 6 महिने झाला होता मेमरी लॉस - दिशा पाटनी

काही दिवसांपूर्वीच या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान सोनाक्षीनं न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या करिअर बद्दल अनेक खुलासे केले होते. सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये जवळपास 10 वर्ष पूर्ण केली आहेत. ती आपल्या करिअर विषयी बोलताना म्हणाली, मागच्या दहा वर्षात मी कोणासोबच स्पर्धेत नव्हते, कोणत्याही रेसमध्ये धावत नव्हते. मागच्या दहा वर्षात मी खूप काम केलं आणि सिनेमांसाठी माझा उत्साह अजही तसाच आहे जसा दहा वर्षांपूर्वी होता. मी आता माझ्या कामात पहिल्यापेक्षा जास्त व्यस्त आहे.

मुलगी जन्मल्यानंतर समीरा रेड्डीची भावुक पोस्ट, ब्रेस्टफिडिंगबद्दल म्हणाली...

सोनाक्षी सिन्हाला जेव्हा तिच्या करिअरमधील हिट फ्लॉपच्या चढ-उताराबाबत विचारण्यात आलं त्यावेळी ती म्हणाली, माझे सिनेमे कधीच फ्लॉप झाले नाही. काही सिनेमांचे बॉक्स ऑफिसवरील आकडे कमी झाले नक्कीच राहीले असतील. मात्र सिनेमानं त्याच्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. मात्र प्रेक्षकांच्या मते ‘नूर’, ‘अकिरा’, ‘तेवर’, ‘एक्शन जॅक्सन’ आणि ‘लुटेरा’ हे तिचे सिनेमे फ्लॉप राहिले. पण सोनाक्षी सांगते, मला माझे सिनेमा कधीच फ्लॉप वाटत नाहीत आणि मी स्वतःला अयशस्वी मानत नाही. कारण मला कधी अपयश आलं नाही आणि मी अपयशी कलाकारांच्या लिस्टमध्येही नाही.

शाहरुख-आमिरचा स्टारडम धोक्यात! येत्या काळात ‘हे’ असतील बॉलिवूडचे प्रसिद्ध चेहरे

======================================================================

ऑन ड्युटी टिक टॉक VIDEO करणं महिला पोलिसांच्या अंगलट, निष्काळजीपणा भोवला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 02:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...