मुंबई, 25 जुलै : अभिनेत्री समीरा रेड्डी काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली. मुलीच्या जन्मानंतर समीरानं तिच्या इन्स्टाग्रामवर मुलीसोबतचा फोटो सुद्धा शेअर केला होता. याशिवाय तिनं मुलीच्या जन्माची गोड बातमी सुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली होती. त्यानंतर तिनं पुन्हा एकदा एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे ज्यात तिनं बाळपणानंतर येणाऱ्या समस्य़ाविषयी लिहिलं आहे. तसेच बाळाच्या जन्मानंतर त्याला ब्रेस्टफिडिंग करताना आईला काय काय समस्या येतात याविषयी तिनं या पोस्टमधून आपलं मतं मांडलं आहे.
समीरा तिच्या गरोदरपणात खूपच उत्साही दिसली होती. तिनं अनेकदा बेबी बंपचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर आई झाल्यावरही तिनं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून तिचा दुसऱ्यांदा आई होण्याचा अनुभव शेअर केला. आपल्या लेटेस्ट पोस्टमध्ये समीरानं सांगितलं की, नुकत्याच जन्मलेल्या बाळाला दूध पाजणं (ब्रेस्ट फिडिंग) किती अवघड असतं.
SPECIAL REPORT : प्रिया वारिअरच किस झाला मिस, असं काय घडलं?
समीरानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘झोप नसतानाही मी खूप खूश आहे. नियमित अंतरानं बाळाला दूध पाजणं. खरं तर मी विसरुन गेले होते की, बाळाला दूध पाजणं खूप कठीण असतं. बाळाला दूध पाजण्याची प्रक्रिया जेवढी नैसर्गिक असते. तेवढीच ती त्रासदायकही असते. अनेक महिलांच्या अनुभवांवरून मला हे समजलं आहे की, यावेळी त्या खूप स्ट्रगल करतात. ब्रेस्ट फिडिंग पुन्हा पुन्हा करणं लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही.’
Dabangg 3 : सलमान खान पडणार अर्ध्या वयाच्या सईच्या प्रेमात
मुलीच्या जन्मानंतर समीराची ही पहिली पोस्ट नाही. याआधी समीरानं तिच्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर करत त्याला, मी मुलीच्या जन्मानंतर खूप खूश आहे. शरीरात अनेक बदल होत असल्यानं हार्मोनलमुळे मला मी ठीक असल्यासारखं वाटत नाही. पण हे सर्व लवकरच ठीक होईल आणि हा विचार करून आपल्याला पुढे जावं लागतं. 2015 मध्ये समीरा पहिल्यांदा आई झाली होती. तिला चार वर्षांचा एक मुलगा आहे.
Bigg Boss Marathi : नेहा-शिवानीच्या मैत्रीत वादाची भिंत, काय आहे नेमकं कारण
==============================================================
घरातूनच करा आता पाकमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक', पाहा हा SPECIAL REPORT
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Sameera reddy