मुंबई, 25 जुलै : अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या फिटनेससाठी खूप चर्चेत असते. ती अनेकदा फिटनेसचे व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. दिशानं मिक्स मार्शल आर्टचं ट्रेनिंग सुद्धा घेतलं आहे. त्याशिवाय नुकत्याच रिलीज झालेल्या तिच्या भारत सिनेमातही ती स्टंट करताना दिसलली होती. मात्र या स्टंटच्या शूटिंगच्या वेळी तिच्या पायाला दुखापत झाली होती. सध्या दिशा यातून रिकव्हर होत आहे. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिशानं तिला या आधी झालेल्या गंभीर दुखापतीविषयी खुलासा केला. ज्यामुळे तिला स्मृतीभ्रंश झाला होता.
शाहरुख-आमिरचा स्टारडम धोक्यात! येत्या काळात ‘हे’ असतील बॉलिवूडचे प्रसिद्ध चेहरे
दिशानं ‘मिड डे’ला दिलेल्य एका मुलाखतीत तिला झालेल्या गंभीर दुखापतीचा खुलासा केला. दिशा म्हणाली, ‘मला एक स्टंट करताना माझ्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे जवळपास 6 महिने मला काहीही आठवत नव्हतं. त्या 6 महिन्यात मी सर्वकाही विसरुन गेले होते. त्यानंतर मी जिमनॅस्टिक आणि मिक्स मार्शल आर्टचं ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली.’ दिशाच्या मते, हाडं तुटणं हे प्रगतीचं लक्षण आहे.
Dabangg 3 : सलमान खान पडणार अर्ध्या वयाच्या सईच्या प्रेमात
दिशा पुढे म्हणाली, जेव्हा मी सिनेमाच्या शूटिंगला नसते, तेव्हा मी जिमनॅस्टिक आणि मिक्स मार्शनल आर्टची प्रॅक्टिस करते. मिक्स मार्शल आर्ट खूप सोपं आहे. मात्र जिमनॅस्टिकसाठी रोजचा सराव असणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा काही हाडं तुटतील त्यावेळी तुम्ही पुढे जाऊन काहीतरी करु शकाल.
SPECIAL REPORT : प्रिया वारिअरच किस झाला मिस, असं काय घडलं?
दिशा लवकरच मोहित सूरीचा आगामी सिनेमा ‘मलंग’मध्ये दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमातील काही भागांचं शूटिंग मॉरिशसमध्ये झालं आहे. ज्यात दिशा अंडर वॉटर सीन करताना दिसणार आहे. ‘मलंग’ हा सिनेमा 2020 मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. याच दिवशी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचा ‘लव्ह आज कल 2’ सुद्धा रिलीज होणार आहे त्यामुळे या दोन्ही सिनेमांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळू शकते. काही दिवसांपूर्वी दिशा आणि टायगरच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू होत्या मात्र त्यानंतर अनेकदा ते दोघंही एकत्र दिसल्यानं या चर्चा फक्त अफवा असल्याचं स्पष्ट झालं.
=========================================================
घरातूनच करा आता पाकमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक', पाहा हा SPECIAL REPORT
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Disha patani