शाहरुख-आमिरचा स्टारडम धोक्यात! येत्या काळात ‘हे’ असतील बॉलिवूडचे प्रसिद्ध चेहरे

शाहरुख, आमिर आणि सलमान या सर्वांचे सिनेमे फ्लॉप झाले. पण याच वेळी काही नव्या अभिनेत्यांनी मात्र बॉक्स ऑफिसवर बाजी मारत सुपरहिट सिनेमे दिले.

  • Share this:

मागील वर्षी अनेक हिट सिनेमा आले. पण बॉलिवूडचे खान मात्र मागच्या संपूर्ण वर्षात आपली कमाल दाखवू शकले नाही. शाहरुख, आमिर आणि सलमान या सर्वांचे सिनेमे फ्लॉप झाले. पण याच वेळी काही नव्या अभिनेत्यांनी मात्र बाजी मारत सुपरहिट सिनेमे दिले. त्यामुळे हे चेहरेच भविष्यातील बॉलिवूडचे सुपरस्टार मानले जात आहेत.

4 वर्षांपूर्वी विकीनं मसान सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमानं बक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर 2018 मध्ये आलेल्या त्याच्या उरी सिनेमानं त्याला खूप लोकप्रियता मिळवून दिली. सध्या त्याच्याकडे ‘उधम सिंह’, ‘भूत: द हॉन्टेड शिप’ आणि ‘सॅम मानेक शॉ’ बायोपिक हे सिनेमा आहेत.

2012 मध्ये ‘विक्की डोनर’ मधून बॉलिवूड पदार्पण करणारा अभिनेता आयुष्यमान खुराना सध्या बॉलिवूडमधील ओळखीचा चेहरा बनला आहे. नुताच रिलीज झालेला त्याचा ‘आर्टिकल 15’ विशेष गाजला. याशिवाय आयुष्यमाननं सलग 5 हिट सिनेमे दिले आहेत. ‘बरेली की बर्फी’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘अंधाधुन’ आणि ‘बधाई हो’ या सिनेमांचा समावेश आहे.

बऱ्याच मोठ्या स्ट्रगल नंतर अभिनेता राजकुमार राव बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरला आहे. 2010 मध्ये त्यानं ‘लव सेक्स और धोखा’ या सिनेमातून त्यानं बॉलिवूड पदार्पण केलं होतं. 2018मध्ये आलेला त्याचा स्त्री सुपरहिट ठरला. लवकरच त्याचा जजमेंटल है क्या हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

टीव्ही ते बॉलिवूड असा प्रावास करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं अनेक सिनेमात काम केलं आहे. पण मागील वर्षी आलेल्या त्याच्या ‘केदारनाथ’नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यानंतर आलेला त्याचा सोनचिडिया फारसा चालला नाही मात्र त्यातील सुशांतच्या अभिनयाचं कौतुक मात्र झालं.

शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टरनं मागील ‘बियॉन्ड द क्लाउड’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं. या सिनेमाचं कूप कौतुक झालं. याशिवाय त्याचा जान्हवी कपूरसोबत आलेला ‘धडक’ सुद्धा गाजला. त्यामुळे बॉलिवूडचा आमागी चेहरा म्हणून इशानकडे पाहिलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 06:27 AM IST

ताज्या बातम्या