Home /News /entertainment /

रामायणाच्या प्रश्नावरून ट्रोल झाली सोनाक्षी, आता म्हणते...

रामायणाच्या प्रश्नावरून ट्रोल झाली सोनाक्षी, आता म्हणते...

रामायणाशी संबंधीत एका प्रश्नामुळे सोनाक्षीला सध्या सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं मात्र आता या ट्रोलिंगला कंटाळून अखेर या ट्रोलर्सना सोनाक्षीनं उत्तर दिलं आहे.

    मुंबई, 21 सप्टेंबर : अमिताभ बच्चन यांचा क्वीज शो 'कौन बनेगा करोडपती'चा 11 वा सीझन मागच्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. प्रत्येक दिवशी काही ना काही कारणानं या शोची सगळीकडे चर्चा होत असते. या शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांमुळे या शोमध्ये दिवसेंदिवस रंगत येत आहे. मात्र 20 सप्टेंबरचा एपिसोड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हामुळे चर्चेत राहिला. हॉट सीटवर बसलेल्या राजस्थानच्या रुमा देवी यांच्या मदतीसाठी सोनाक्षी KBC 11 च्या सेटवर आली होती. यावेळी रामायणाशी संबंधीत एका प्रश्नावर सोनाक्षी अडकली आणि यासाठी तिला लाइफलाइन घ्यावी लागली. पण यामुळे ती सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. या ट्रोलिंगला कंटाळून अखेर या ट्रोलर्सना सोनाक्षीनं उत्तर दिलं आहे. सोनाक्षीनं तिच्या ट्विटरवर एक पोस्ट करत ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. तिनं लिहिलं, 'प्रिय जागरुक ट्रोलर्स, मला पायथागोरस प्रमेय आठवत नाही, मर्चेंट ऑफ व्हेनिस, मुघलांची वंशावळ, पेरियॉडिक टेबल आणि आणखी काय काय लक्षात नाही हे सुद्धा लक्षात नाही. पण तुमच्याकडे एवढा वेळ असेल तर आणि काहीही काम नसेल तर प्लिज या सर्वावर मीम्स तयार करा. I Love Memes' यावर सोनाक्षीला पुन्हा एकदा ट्रोल केलं जात आहे. तिच्या या ट्वीटच्या कमेंट बॉक्समध्येही तिची खिल्ली उडवली जात आहे. लीक झाला Bigg Boss 13 चा प्रोमो, व्हिडीओमधून समोर आली स्पर्धकांची नावं 20 सप्टेंबरला टेलिकास्ट झालेल्या एपिसेडमध्ये राजस्थानच्या रुमा देवी हॉट सीटवर बसल्या होत्या. यावेळी त्यांच्या मदतीसाठी सोनाक्षी या शोमध्ये पोहोचली. अमिताभ यांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं तिनं बरोबर दिली. मात्र अमिताभ यांनी विचारलेल्या एका सोप्या प्रश्नावर मात्र ती अडकली तिला या प्रश्नाचं उतत्र देता आलं नाही. हा प्रश्न होता, रामायणा अनुसार हनुमंताने कोणासाठी संजीवनी औषधी आणली होती. A सुग्रीव B लक्षण C सीता D राम पैशाअभावी झाला रुमा देवींच्या मुलाचा मृत्यू, असं बदललं 22 हजार महिलांचं आयुष्य या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ आली त्यावेळी मात्र सोनाक्षीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. या पर्यांमधून सोनाक्षीला अचूक पर्याय निवडता आला नाही. शेवटी तिनं यासाठी लाइफलाइनचा वापर केला. मात्र एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर न देता आल्यानं सोनाक्षीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. एका युजरनं लिहिलं, 'या स्टार किड्सना खरंच आपल्या संस्कृतीची माहिती नाही.' तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलं, मला वाटायचं की बॉलिवूडच्या इतिहासात अनन्या पांडे सर्वात खराब अभिनेत्री आहे मात्र आता सोनाक्षी माझं मत खोटं ठरवलं. असं करुन ती आता आलिया भट आणि अनन्या पांडे यांनाही टक्कर देत आहे. या सर्व गोंधळात सोनाक्षी सोशल मीडियावर तर ट्रोल झालीच त्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही तिची शाळा घेतली. सोनाक्षीच्या वडीलांचं नाव शत्रुघ्न आहे. तिच्या काकांची नावं राम, लक्ष्मण आणि भरत आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या घराचं नावही रामायण अशा  तसेच तिच्या दोन्ही भावांची नावंही लव आण कुश अशी आहेत. मग सोनाक्षी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नाही असं अमिताभ यांनी म्हटलं. रामायणातील प्रश्नावर सोनाक्षीचं अजब उत्तर, सोशल मीडियावर लोकांनी उडवली खिल्ली ============================================================ VIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले...
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Sonakshi sinha

    पुढील बातम्या