Home /News /entertainment /

KBC 11 : पैशाअभावी झाला रुमा देवींच्या मुलाचा मृत्यू, नंतर असं बदललं 22 हजार महिलांचं आयुष्य

KBC 11 : पैशाअभावी झाला रुमा देवींच्या मुलाचा मृत्यू, नंतर असं बदललं 22 हजार महिलांचं आयुष्य

वयाच्या 17 व्या वर्षी लग्न झालेल्या रुमा देवी यांचं आयुष्य नेहमी संघर्षमय राहिलं.

    मुंबई, 21 सप्टेंबर : अमिताभ बच्चन यांचा क्वीज शो 'कौन बनेगा करोडपती'चा 11 वा सीझन मागच्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. प्रत्येक दिवशी काही ना काही कारणानं या शोची सगळीकडे चर्चा होत असते. या शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांमुळे या शोमध्ये दिवसेंदिवस रंगत येत आहे. शुक्रावारी प्रसारित झालेल्या कर्मवीर एपिसोडमध्ये राजस्थानामधील बाड़मेर गावच्या रुमा देवी यांनी भाग घेतला होता. यावेळी रुमा देवी यांचा आत्तापर्यंतचा जीवनप्रवास त्या ठिकामी उलगडला. वयाच्या 17 व्या वर्षी लग्न झालेल्या रुमा देवी यांचं आयुष्य नेहमी संघर्षमय राहिलं. मात्र त्यांनी या संघर्षातूनच स्किल ट्रेनिंगच्या माध्यमातून 22 हजार महिलांचं आयुष्य बदलून टाकलं. रुमा देवी यांना त्याच्या या योगदानाबद्दल 2018 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला. रुमा देवी सांगतात, 'लग्नाच्या नंतर ज्यावेळी मी सासरी आले, तेव्हा माझ्याकडे पैसे कमावण्याचा कोणताही मार्ग नव्हता. मला भरतकाम येत असे. त्यामुळे मी त्यातूनच पैसे कमवण्याचा विचार केला. मी ठरवलं की काहीतरी करुन दाखवायचं, या दरम्यान मला घरातल्यांचे आणि बाहेरच्या लोकांची टोमणे सुद्धा ऐकावे लागले. 10 महिलांना एकत्र करुन कामाला सुरुवात केली.' सैफच्या अगोदर 'या' मिस्टर खानवर जडला होता करीनाचा जीव रुमा सुरुवातीला घरीच भरतकाम करत असत मात्र त्यातून जास्त फायदा होत नव्हता. त्यावेळी त्या ग्रामीण विकास चेतना संस्थेशी जोडल्या गेल्या. या संस्थेकडून त्यांना काही पैसे मिळाले. रुमा देवी यांच्या या कामामुळे प्रभावित होऊन सोनाक्षी सिन्हा त्यांना मदत करण्यासाठी केबीसीमध्ये पोहोचली. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं केलं हॉट फोटोशूट रुमा सुरुवातीला कलाकुसरीचे बॅग आणि पडदे तयार करत असत. त्यानंतर त्यांनी सलवार सूट आणि दुपट्टे तयार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपल्या कपड्याचा प्रचार करणयासाठी फॅशन शोमध्ये भाग घेण्याचा विचार केला मात्र त्यात त्यांना जागा मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी स्वतःच फॅशन शोचं आयोजन केलं आणि आपल्या कपड्यांचा प्रचार करण्यासा सुरुवात केली. आपल्या खासगी आयुष्याविषयी रुमा सांगतात, लग्नानंतर दिड वर्षात माझ्या मुलाचा जन्म झाला. मात्र तो ज्यावेळी आजारी पडला त्यावेळी त्याच्यावर उपचार करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे सुद्धा नव्हते. तो फक्त 48 तास जिवंत राहिला. मी त्याला वाचवू शकले नाही. पैशांच्या कमतरतेमुळे मी त्याला वाचवू शकले नाही. मात्र या घटनेनं मला खूप काही शिकवलं. मी विचार केला, माझ्यासारख्या कितीतरी महिला अशाप्रकरे आयुष्य जगत असतील अशा महिलांचं आयुष्य बदलायचं मी ठरवून टाकलं. दीपवीरच्या IIFA लुकवर नेटकरी सैराट, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस रुमा देवी यांचा हा जीवनप्रवास ऐकल्यावर सोनाक्षी सिन्हानं मी तुमच्या कपड्यांची ब्रान्ड अ‍ॅम्बेसिडर होऊन तुमच्या कपड्याची जाहिरात करेन असं आश्वासन दिलं. केबीसीमध्ये जिंकलेल्या या रक्कमेचं काय करणार या प्रश्नावर रुमा म्हणाल्या बाड़मेरमध्ये धाग्याची गरज असते जो आम्हाला दिल्लीवरून मागवावा लागतो. तर आम्हाला लागणारं कापड हे दक्षिण भारतातून येतं. त्यामुळे हे सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळेल अशी काहीतरी सोय करण्यासाठी मी हा पैसा वापरणार आहे. रुमा देवींनी 12.50 लाखाची रक्कम जिंकली. ================================================================ VIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले...
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या