Home /News /entertainment /

लीक झाला Bigg Boss 13 चा प्रोमो, व्हिडीओमधून समोर आली स्पर्धकांची नावं

लीक झाला Bigg Boss 13 चा प्रोमो, व्हिडीओमधून समोर आली स्पर्धकांची नावं

टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त शो बिग बॉसचा 13 वा सीझन लवकरच सुरू होत आहे.

  मुंबई, 21 सप्टेंबर : सध्या छोट्या पडद्यावर रिअलिटी शोची चलती आहे. अशातच टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त शो बिग बॉसचा 13 वा सीझन लवकरच सुरू होत आहे. यंदाचा हा सीझन सुरुवातीपासूनच प्रचंड चर्चेत आहे. कधी शोचा होस्ट सलमान खानमुळे तर कधी या सीझनच्या स्पर्धकाच्या यादीमुळे या शोची चर्चा सातत्यानं होत आहे. नुकताच सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला आहे की, या सीझनचा प्रोमो लीक झाला आहे. ज्यामुळे या सीझनमध्ये काही स्पर्धकांची नावं उघड झाली आहेत. बिग बॉसचा 13 वा सीझन येत्या 29 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यावेळी या शोमध्ये काहीतरी वेगळं असणार आहे अशी चर्चा सुरुवातीपासूनच आहे. पण या शोमध्ये कोणकोणते स्पर्धक असणार याबाबत मात्र प्रेक्षकांच्या मनात अद्याप उत्सुकता कायम आहे. अशातच आता या शोचा नवा प्रोमो लीक झाल्याचं बोललं जात आहे. इन्स्टाग्रामवरील बिग बॉसच्या एका फॅनपेज वरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओप्रमाणे छोट्या पडद्यावरील संस्कारी बहू देवोलीना भट्टाचार्जी आणि सिद्धार्थ शुक्ला यांची नावं समोर येत आहेत. मात्र जो पर्यंत बिग बॉसच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकउंटवरून कोणतीही माहिती मिळत नाही तो पर्यंत या व्हिडीओवर विश्वास ठेवणं कठीण आहे. रामायणातील प्रश्नावर सोनाक्षीचं अजब उत्तर, सोशल मीडियावर लोकांनी उडवली खिल्ली
  लीक झालेल्या या प्रोमोच्या व्हिडीओमध्ये विकास गुप्ता आणि काम्या पंजाबी देवोलीना भट्टाचार्जीबद्दल बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये देवोलीनाचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरीही तिच्या पुसटशा दिसणाऱ्या चेहऱ्यावरुन ती देवोलीना असल्याचा अंदाज चाहत्यांकडून लावला जात आहे. तर सिद्धार्थ शुक्ला खतरों के खिलाडी  सीझन 7 चा विजेता आहे. सैफच्या अगोदर 'या' मिस्टर खानवर जडला होता करीनाचा जीव बिग बॉस 13 बद्दल बोलायचं तर या सीझनच्या स्पर्धकांच्या यादीत चंकी पांडे, राजपाल यादव, वरीना हुसैन, टीवी अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी, अंकिता लोखंडे, राकेश वशिष्ठ, माहिका शर्मा, डैनी डी, जीत, सांसद चिराग पासवान, बॉक्सर विजेंद्र सिंह, राहुल खंडेलवाल, मेघना मलिक, मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती, दयानंद शेट्टी, फैजी बू, सोनल चौहान, सिद्धार्थ शुक्ला यांची नावं समोर आली आहेत. याशिवाय राखी सावंत आणि दीपक कलाल याच्या नावांच्याही चर्चा सुरू आहेत. मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं केलं हॉट फोटोशूट ==================================================== VIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले...
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bigg boss, Bollywood

  पुढील बातम्या