रामायणातील प्रश्नावर सोनाक्षीचं अजब उत्तर, सोशल मीडियावर लोकांनी उडवली खिल्ली

रामायणातील प्रश्नावर सोनाक्षीचं अजब उत्तर, सोशल मीडियावर लोकांनी उडवली खिल्ली

हॉट सीटवर बसलेल्या राजस्थानच्या रुमा देवी यांच्या मदतीसाठी सोनाक्षी KBC 11 च्या सेटवर आली होती.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : अमिताभ बच्चन यांचा क्वीज शो 'कौन बनेगा करोडपती'चा 10 वा सीझन मागच्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. प्रत्येक दिवशी काही ना काही कारणानं या शोची सगळीकडे चर्चा होत असते. या शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांमुळे या शोमध्ये दिवसेंदिवस रंगत येत आहे. मात्र 20 सप्टेंबरचा एपिसोड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हामुळे चर्चेत राहिला. हॉट सीटवर बसलेल्या राजस्थानच्या रुमा देवी यांच्या मदतीसाठी सोनाक्षी KBC 11 च्या सेटवर आली होती. यावेळी तिनं काही प्रश्नांची उत्तरं दिली मात्र एका सोप्या प्रश्नावर ती अडकली आणि यामुळेच तिला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागत आहे.

20 सप्टेंबरला टेलिकास्ट झालेल्या एपिसेडमध्ये राजस्थानच्या रुमा देवी हॉट सीटवर बसल्या होत्या. यावेळी त्यांच्या मदतीसाठी सोनाक्षी या शोमध्ये पोहोचली. अमिताभ यांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं तिनं बरोबर दिली. मात्र अमिताभ यांनी विचारलेल्या एका सोप्या प्रश्नावर मात्र ती अडकली तिला या प्रश्नाचं उतत्र देता आलं नाही. हा प्रश्न होता, रामायणा अनुसार हनुमंताने कोणासाठी संजीवनी औषधी आणली होती.

A सुग्रीव

B लक्षण

C सीता

D राम

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं केलं हॉट फोटोशूट

या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ आली त्यावेळी मात्र सोनाक्षीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. या पर्यांमधून सोनाक्षीला अचूक पर्याय निवडता आला नाही. शेवटी तिनं यासाठी लाइफलाइनचा वापर केला. मात्र एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर न देता आल्यानं सोनाक्षीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

दीपवीरच्या IIFA लुकवर नेटकरी सैराट, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

एका युजरनं लिहिलं, 'या स्टार किड्सना खरंच आपल्या संस्कृतीची माहिती नाही.' तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलं, मला वाटायचं की बॉलिवूडच्या इतिहासात अनन्या पांडे सर्वात खराब अभिनेत्री आहे मात्र आता सोनाक्षी माझं मत खोटं ठरवलं. असं करुन ती आता आलिया भट आणि अनन्या पांडे यांनाही टक्कर देत आहे.

या सर्व गोंधळात सोनाक्षी सोशल मीडियावर तर ट्रोल झालीच त्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही तिची शाळा घेतली. सोनाक्षीच्या वडीलांचं नाव शत्रुघ्न आहे. तिच्या काकांची नावं राम, लक्ष्मण आणि भरत आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या घराचं नावही रामायण अशा  तसेच तिच्या दोन्ही भावांची नावंही लव आण कुश अशी आहेत. मग सोनाक्षी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नाही असं अमिताभ यांनी म्हटलं.

रुमा देवींनी जिंकले इतके लाख

हॉट सीटवर बसलेल्या राजस्थानच्या रुमा देवी या महिला सशक्तीकरणाचं काम करतात. त्यांच्या या कामासाठी त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते नारी शक्ती पुरस्करही देण्यात आला आहे. त्या कर्मवीर स्पेशल एपिसोडमधून KBC च्या मंचावर आल्या होत्या. त्यांनी या शोमध्ये 12 लाख 50 हजार रुपयांची रक्कम जिंकली.

VIRAL VIDEO : IIFA अवॉर्ड फंक्शनमध्ये सलमान खानच्या मागे लागला कुत्रा

=====================================================

VIDEO: मोदींच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 12:33 PM IST

ताज्या बातम्या