Home /News /entertainment /

'संजीवनी कोणी आणली होती?' सोनाक्षीच्या उत्तरानं झाली सर्वांची बोलती बंद

'संजीवनी कोणी आणली होती?' सोनाक्षीच्या उत्तरानं झाली सर्वांची बोलती बंद

मागच्या वर्षी केबीसीमध्ये सोनाक्षीला संजीवनी आणायला कोण गेलं होतं? हा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्यावेळी सोनाक्षीला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं.

  मुंबई, 18 एप्रिल : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला रामायणाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून बरंच ट्रोल व्हाव लागलं आहे. केबीसीपासून सुरू झालेलं हे ट्रोलिंग अद्याप थांबायचं नाव घेत नाही. काही ना काही कारणानं सर्वजण सोनाक्षीला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मागच्या वर्षी केबीसीमध्ये सोनाक्षीला संजीवनी आणायला कोण गेलं होतं? हा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्यावेळी सोनाक्षीला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. सोनाक्षीनं लॉकडाऊनमध्ये नुकतंच इन्स्टाग्रामवर Ask Me A Question सेशन घेतलं होतं. यामध्ये तिला वेगवेगळे प्रश्न विचारले गेले. मात्र यासोबतच अनेकांनी पुन्हा एकदा संजीवनी बुटीबाबत प्रश्न विचारले आणि विशेष म्हणजे या वेळी सोनाक्षीनं असं काही उत्तर दिलं की प्रश्न विचारणाऱ्यांचीच बोलती बंद झाली आहे. मलायकाशी लग्नाचा काय प्लान आहे? चाहत्याच्या प्रश्नावर अर्जुनचं धम्माल उत्तर
  View this post on Instagram

  Something tells me I’m on the right track 😉

  A post shared by Sonakshi Sinha (@aslisona) on

  सोनाक्षीला अनेकांनी या सेशनमध्ये संजीवनी बुटी कोणी आणली होती? असा प्रश्न विचारला होता. ज्याचं उत्तर देताना सोनाक्षी म्हणाली, 'बरेच लोक मला हा प्रश्न विचारत आहेत. त्या सर्वांसाठी एकच सांगेन सध्या दूरदर्शनवर रामायण सुरू आहे. ते पाहिलं तर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आपोआप मिळाली असती. जय बजरंगबली' सोनाक्षीच्या या सडेतोड उत्तरानं सर्वांची बोलती बंद झाली असून आता लोकांनी तिला ट्रोल करणं बंद केलं आहे. काही दिवसांपूर्वीच रामायण आणि महाभारत या लोकप्रिय शोचं रि-टेलिकास्ट सुरू करण्यात आलं आणि या शोमधील कलाकारांना त्यांची मतं मांडण्याची संधी मिळाली. दरम्यान अभिनेता मुकेश खन्ना यांनी सोनाक्षी सिन्हावर निशाणा साधत या प्रश्नाचं उत्तर माहित नसल्याबाबत निराशा व्यक्त केली होती. त्यानंतर मुलांचा वाद मोठ्यांपर्यंत पोहोचला आणि त्यात शत्रुघ्न सिन्हा यांनी उडी घेतली. त्यांनी मुकेश खन्ना यांना तुम्हाला हिंदू धर्माचा गॉर्जियन कोणी बनवलं असा प्रश्न केला आणि याला महाभारतात दुर्योधनाची भूमिका साकारणारा अभिनेता पुनित इस्सार यांनीही साथ दिली. बॉयफ्रेंड असावा तर असा! पत्रलेखासाठी राजकुमार झाला हेअर स्टायलिस्ट, पाहा VIDEO अनुष्कानं केली विराटच्या चाहत्याची नक्कल, म्हणाली; ओय कोहली चौका मार ना...
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Sonakshi sinha

  पुढील बातम्या