Home /News /entertainment /

मलायकाशी लग्न करण्याचा काय प्लान आहे? चाहत्याच्या प्रश्नावर अर्जुनचं धम्माल उत्तर

मलायकाशी लग्न करण्याचा काय प्लान आहे? चाहत्याच्या प्रश्नावर अर्जुनचं धम्माल उत्तर

लाइव्ह चॅटमध्ये एका चाहत्यानं विचारलं गर्लफ्रेंड मलायकाशी लग्नाबाबत तुझा काय प्लान आहे. यावर अर्जुननं धम्माल उत्तर दिलं.

  मुंबई, 17 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जग ठप्प झालं आहे. त्यामुळे नेहमीच बीझी असणारे बॉलिवूड सेलिब्रेटींकडे सुद्धा बराच रिकामा वेळ आहे. त्यामुळे सध्या सगळेच सोशल मीडियावर बरेच सक्रिय झाले आहेत. इन्स्टग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. अशात अभिनेता अर्जुन कपूरला एका लाइव्ह चॅटमध्ये एका चाहत्यानं मलायकाशी लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला. त्यावर अर्जुननं अगदी धम्माल उत्तर दिलं. बॉलिवूड हंगामाशी झालेल्या लाइव्ह चॅट सेशनमध्ये अर्जुननं त्याच्या लव्ह लाइफबद्दल अनेक खुलासे केले. या लाइव्ह चॅटमध्ये एका चाहत्यानं विचारलं गर्लफ्रेंड मलायकाशी लग्नाबाबत तुझा काय प्लान आहे. यावर अर्जुननं धम्माल उत्तर दिलं. तो म्हणाला, जेव्हा मी लग्न करेन तेव्हा तुम्हाला सर्वांना नक्की सांगेन. सध्या तरी काही प्लान नाही आहे आणि समजा असेलच तरीही आता कसं लग्न करणार? सध्या तरी लग्नाचा कोणताही प्लान नाही. पण जेव्हा लग्न करायचं असेल तर कोणापासून काहीही लपवणार नाही. अनुष्कानं केली विराटच्या चाहत्याची नक्कल, म्हणाली; ओय कोहली चौका मार ना...
  मलायका आणि अर्जुन यांच्या लग्नाबाबत आतापर्यंत अनेक अफवा पसरल्या आहेत. मात्र प्रत्येक वेळी अर्जुननं अद्याप तरी मलायकाशी लग्न करण्याचा कोणताही प्लान नाही हे स्पष्ट केलं आहे. सध्या त्यांचं नातं ज्या ठिकाणी आहे त्यात ते दोघंही खूश आहेत असं त्यानं म्हटलं आहे. पण त्यांच्या चाहत्यांना मात्र त्यांच्या लग्नाबाबत बरीच उत्सुकता असलेली पाहायला मिळत आहे. मुलाच्या बर्थ डे कोणीच आलं नाही म्हणून पोलीसांनीच दिलं सरप्राइज, पाहा VIDEO मागच्या दोन वर्षांपासून मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत आहेत. सुरुवातीच्या काळात या दोघांनीही त्यांचं नातं लपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेवटी त्यांनी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली देऊन टाकली. अभिनेत्यानं केलं चीनचं Tik Tok अ‍ॅप बॅन करण्याचं आवाहन, नेमकं काय आहे कारण
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Arjun kapoor, Bollywood, Malaika arora

  पुढील बातम्या