मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'मैने प्यार किया' पाहून सलमानवर भाळली अन 16 व्या वर्षीच भारतात आलेली सोमी अली नक्की आहे तरी कोण?

'मैने प्यार किया' पाहून सलमानवर भाळली अन 16 व्या वर्षीच भारतात आलेली सोमी अली नक्की आहे तरी कोण?

सलमान खान - सोमी अली

सलमान खान - सोमी अली

सलमान खानच्या चाहत्यांच्या यादीत एक मुलगी होती, जी त्याचे प्रेम मिळवण्यासाठी अमेरिकेतून भारतात आली होती. ती मुलगी सलमान खानशी लग्न करण्यासाठीच मुंबईत आली होती. पण तिच्यासोबत धक्कादायक घटना घडल्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 जानेवारी :  सलमान खानचा 'मैने प्यार किया' हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो रातोरात स्टार झाला. देश-विदेशातील लाखो मुली त्याच्यावर भाळल्या होत्या. तेव्हा त्याची एक झलक पाहण्यासाठी मुली आतुर व्हायच्या. सलमान खानची फॅन फॉलोईंग त्या काळी जबरदस्त होती. सलमान खानच्या चाहत्यांच्या यादीत एक मुलगी होती, जी त्याचे प्रेम मिळवण्यासाठी अमेरिकेतून भारतात आली होती. ती मुलगी सलमान खानशी लग्न करण्यासाठीच मुंबईत आली होती. पण तिच्यासोबत धक्कादायक घटना घडल्या. हि मुलगी  दुसरी तिसरी कोणी नसून सलमान खानवर सध्या गंभीर आरोप करणारी सोमी अली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमी अली जेव्हा भारतात आली तेव्हा ती जवळपास 16 वर्षांची होती. ती आणि सलमान खान 1991 ते 1999 पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. 8 वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये अभिनेत्री सलमान खानबद्दल बरेच काही शिकली आणि समजून घेतले. तिने सलमानसोबत चित्रपटात देखील नशीब अजमावलं पण ती फारशी यशस्वी ठरली नाही. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमीने फिल्म इंडस्ट्रीला कायमचा अलविदा केला होता.

हेही वाचा - Kranti Redkar: अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी; ओळखीच्याच व्यक्तीनं मारला लाखोंच्या वस्तूवर डल्ला

'द फ्री प्रेस जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीत सोमीने सांगितले होते की, ती एकदा सलमान खानसोबत नेपाळच्या ट्रिपला गेली होती. ती भाईजानच्या शेजारी बसली होती. त्याने सलमानला त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा सांगितली. भाईजानने सांगितले की त्याची आधीच एक गर्लफ्रेंड आहे. सोमीच्या म्हणण्यानुसार, दोघांनी एका वर्षानंतर डेट करायला सुरुवात केली. तेव्हा ती 17 वर्षांची होती.

View this post on Instagram

A post shared by Somy Ali (@realsomyali)

आता सोमी अली सोशल मीडियावर सलमान खानला टार्गेट करत असते. एका पोस्टमध्ये सलमान खानचे नाव न घेता त्याने अनेक मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. सोमीने पोस्टमध्ये लिहिले की, "जो मुलींवर हात उचलतो, त्याने केवळ माझ्यासोबतच नाही, तर अनेक मुलींसोबत असे केले." तिने सलमानवर गैरवर्तन केल्याचा आरोपही केला.

सोमी अलीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वेगवेगळे फोटो पोस्ट करत तिची याविषयीची मुलाखत शेअर केली आहे. लहानपणी झालेलं शोषण आणि त्यानंतर सलमानबरोबर असताना झालेलं शोषण याबद्दल तिने भाष्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये सलमान तिला सिगरेटचे चटके द्यायचा, लैंगिक आणि शारीरिक शोषण करायचा असे गंभीर आरोप लावले आहेत. जेव्हा सोमीने याबद्दल आधी भाष्य केलं होतं तेव्हा सलमानने तिच्या डोक्यात एक बाटली फोडल्याच्या घटनेबद्दल बरीच चर्चा रंगली होती. या घटनेतील तथ्य सोमीने या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

कामाबद्दल बोलायचे झाले तर 46 वर्षीय सोमी अलीने 90 च्या दशकात अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत चित्रपट केले. ती मिथुन चक्रवर्तीसोबत 'कृष्ण अवतार'मध्ये दिसली होती. ती सुनील शेट्टीसोबत 'चीटी'मध्ये दिसली होती. तिला सैफ अली खानसोबत 'यार गद्दार'मध्ये स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. आता ती कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिलांसाठी 'नो मोअर टीअर्स' नावाची एनजीओ चालवते.

First published:

Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Salman khan