मुंबई, 07 जानेवारी : मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर कायम चर्चेत असते. ही अभिनेत्री सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चेत असते. रोजच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या घटनांवरील तिचे व्हिडीओ चांगलेच हिट होतात. आर्यन खान ड्रग केसवर काम करणारे आणि याचा तपास करणारे पोलीस अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची ती पत्नी आहे. मात्र आता तिचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. याचं कारण म्हणजे क्रांती रेडकर हिच्या घरी चोरी झाल्याचे प्रकरणं नुकतेच उघडकीस आले आहे.
अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्या घरात चोरी झाली आहे. तिच्या घरात चोरी झाल्याचं प्रकरण आताच समोर आलं आहे. त्याच बरोबर ही चोरी कोणी केली आहे त्या व्यक्तीचं नावं ही समोर आलं आहे. तिच्या घरात काम करणाऱ्या मोलकरनीने ही चोरी केली आहे असा आरोप क्रांतीने केला आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरनीने ही चोरी केली असल्याचा आरोप क्रांती रेडकर हीने केला आहे. घरातील मौल्यवान असे साडेचार लाख रुपये किमतीचे घड्याळं चोरी झाल्याची तक्रार क्रांतीने नुकतीच गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनतर गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून यासंदर्भात अधिकचा तपास करत आहेत.
हेही वाचा -
या प्रकरणाबद्दल पोलिसांनीही काही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांती रेडकर यांनी एका एजन्सी मार्फत घरात काम करणाऱ्या महिलेची नेमणूक केली होती. मात्र काही दिवस काम केल्यानंतर घरात कोणी नसताना योग्य संधी साधत तिने ही चोरी केली. त्यानंतर ही महिला फरार झाली आहे. आता गोरेगाव पोलीस त्या महिलेला नोकरीवर ठेवलेल्या एजन्सीचा तपास करत असून त्या महिलेचा देखील शोध घेत आहेत.
View this post on Instagram
घड्याळाची चोरी ही खरंतर खूप दिवसांपूर्वी झाली होती, पण ही बाब आत्ताच लक्षात आल्याने याबद्दल ५ जानेवारीला तक्रार नोंदवली गेल्याचं सांगण्यात येत आहे. मोलकरीण उत्तर प्रदेशला गेल्याने पोलिस तिला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशकडे रवाना झाले आहेत.
अभिनेत्री क्रांती रेडकर मध्यंतरी चित्रपटसृष्टीपासुन दूर होती मात्र ती आता पुन्हा सक्रिय झाली आहे. अभिनेत्रीला दिग्दर्शिका म्हणून आपण बघितले आहे. आता ती निर्माती म्हणून लवकरच आपल्यासमोर येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.