Home /News /entertainment /

सुशांत सिंहच्या सोशल अकाऊंटवर व्यक्त केला संशय; पोलिसांनी ट्विटरकडून मागितली माहिती

सुशांत सिंहच्या सोशल अकाऊंटवर व्यक्त केला संशय; पोलिसांनी ट्विटरकडून मागितली माहिती

सुशांत सिंहच्या आत्महत्येबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलीस याचा तपास करीत आहेत

    मुंबई, 25 जून : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या बातमीनंतर इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. एकीकडे सुशांतच्या चाहत्यांना हे जाणून घ्यायचे आहे की त्याने आत्महत्येसारखे पाऊल का उचलले, तर  दुसरीकडे सोशल मीडियावर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार चर्चा सुरू आहे. या दरम्यान पोलीस सुशांतच्या आत्महत्येचा तपास करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुशांतशी संबंधित अनेकांची चौकशी सुरू आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या सोशल अकाऊंटबद्दल पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. या तपासणीसाठी पोलिसांनी ट्विटरकडून माहिती मागितली आहे. हे वाचा-धक्कादायक! सुशांतसिंह राजपूतनंतर आता या 16 वर्षीय TikTok स्टारनं केली आत्महत्या आत्महत्येप्रकरणी पोलीस चौकशी सुरू असून अशा परिस्थितीत काही नवीन माहिती समोर येत आहे. 20 जूनपर्यंत पोलिसांनी 23 जणांची चौकशी केली आहे. आता पोलीस सुशांतसिंग राजपूत याच्या ट्विटर अकाऊंट आत्महत्येपूर्वी केलेल्या ट्विटचा शोध घेत आहेत. पिंकविलाच्या अहवालानुसार पोलिसांना असा संशय आहे की, सुशांतच्या ट्विटर अकाऊंटवरुन काही ट्विट गायब आहेत.  ज्याची चौकशी पोलीस करीत आहेत. या अहवालानुसार मुंबई पोलिसांनी ट्विटरला गेल्या 6 महिन्यांपासून सुशांत सिंह राजपूतचा रेकॉर्ड मागितला आहे. हे वाचा-VIDEO : 'मृत्यूची भीती वाटते', हसऱ्या चेहऱ्यानेच सुशांत सिंहने दिली होती कबुली मात्र, अद्याप पोलिसांनी याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. अशा परिस्थितीत नेमकी माहिती सांगता येऊ शकत नाही. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या अनेक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. त्यापैकी त्याची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट खूप चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या आईची एक प्रतिमा शेअर करीत भावनिक संदेश लिहिला आहे.   संपादन - मीनल गांगुर्डे  
    First published:

    Tags: Sushant sing rajput, Twitter account

    पुढील बातम्या