...और प्यार हो गया ! 'या' व्यक्तीमुळे सुरू झाली निक-प्रियांकाची लव्हस्टोरी

...और प्यार हो गया ! 'या' व्यक्तीमुळे सुरू झाली निक-प्रियांकाची लव्हस्टोरी

निक आणि प्रियांका एका स्टेडियममध्ये एकत्र दिसल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली होती.

  • Share this:

मुंबई, 2 मे : अमेरिकन गायक निक जोनस आणि प्रियांका चोप्रा हे सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल आहे. सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या जोडीच्या लग्नाआधी त्यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा झाली. पण त्याबाबत त्यावेळी जास्त कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे आजही लोकांना त्याच्या लव्हस्टोरीबाबत तेवढीच उत्सुकता आहे. मात्र फार कमी लोकांना त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात नेमकी कुठून झाली हे माहित आहे. त्यावेळी निक-प्रियांकाचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ते दोघं एका स्टेडियममध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली.

 

View this post on Instagram

 

Epic table 23! @ralphlauren #metgala2017 @michaelbjordan @armiehammer @laurenblauren @lilyaldridge @nickjonas @bobby_cannavale @thisisechambers #rosebyrne

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

'KBC'चं रजिस्ट्रेशन आजपासून सुरू, असं होऊ शकता तुम्हीही सहभागी

निक-प्रियांकाची ओळख त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा सुरू होण्याच्या बराच काळ अगोदर झाली होती. कधी हे दोघं 'गाला'च्या रेड कार्पेटवर एकत्र दिसले तर कधी निकच्या भावाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये. त्यामुळे या दोघांची भेट नेमकी कोणी घडवून आणली याचा अंदाज लावणं खूप कठीण होतं. पण बऱ्याच काळानं या गोष्टीचा खुलासा झाला की, निक आणि प्रियांकाची भेट WWE रेसलर ड्वेन जॉनसन म्हणजेच 'द रॉक'मुळे झाली. 2017मध्ये 'द रॉक'चे दोन मोठे सिनेमा रिलीज झाले. यातील एक 'जुमांजी- वेलकम टू द जंगल'  आणि दुसरा होता, 'बेवॉच', रॉकमुळे या दोन्ही सिनेमातील कलाकारांच्या भेटी होत असत.

'डिजेवाले बाबू'च्या या महागड्या गाडीची चर्चा, बोनेटवर चढून काढलेला फोटो झाला व्हायरल

'बेवॉच'मध्ये प्रियांकनं रॉक सोबत काम केलं होतं तर 'जुमांजी'ध्ये निक रॉकसोबत दिसला होता. अनेकदा या सिनेमांच शुटिंग एकाच स्टुडिओमध्ये होत असे. त्यावेळी निक आणि प्रियांकाची भेट पहिली भेट झाली होती. त्यानंतर झालेल्या एका मुलाखतीत 'जर ते दोघं एकमेकांसोबत खूश आहेत तर हो हे मीच केलं आहे.' असं म्हणत रॉकने निक-प्रियांकाला एकत्र आणल्याचं कबूलही केलं होतं.

जेव्हा 'हे' स्टार कपल दुष्काळग्रस्त गावातील ढाब्यावर भेळ आणि उसाचा रस पिताना

खरंतर रॉकने त्यावेळी ही गोष्टी गंमत म्हणून सांगितली होती. मात्र या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान झालेल्या भेटींनंतर निक आणि प्रियांकमधील जवळीक वाढली आणि रॉकचे हे दोन्ही सहकलाकार आता एकमेकांचे पति-पत्नी आहेत. रॉकच्या रिलेशनशिपविषयी बोलायचं झालं तर त्यानं 2007मध्ये आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला असून सध्या तो त्याची गर्लफ्रेंड लॉरेन हाशियानसोबत राहतो.

First published: May 2, 2019, 9:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading