डिंपल कपाडिया सोबतच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अखेर बोलला सनी देओल

डिंपल कपाडिया सोबतच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अखेर बोलला सनी देओल

पुजा देओलशी लग्न केल्यानंतरही सनी देओल डिंपल कपाडियासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या.

  • Share this:

मुंबई, 2 एप्रिल : अभिनेता सनी देओलनं काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. भाजमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला पंजाबच्या गुरदासपूरमधून निवणुकीची उमेदवारी देण्यात आली. एकीकडे सनी देओलच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे सनीनं काही वर्षांपूर्वी डिंपल कपाडियासोबत व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवर सर्वांना चकित करणारी प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्या व्हायरल व्हिडिओबाबत मला माहित आहे मी कशासाठी जबाबदार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

Pal pal Dil Ke Paas

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol) on

काही वर्षांपूर्वी सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचा लंडन बस स्टँडवरील एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये डिंपलनं एका हातात सिगरेट पकडली होती तर तिचा दुसरा हात सनीच्या हातात होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पुन्हा एकदा सनी आणि डिंपल यांच्या नात्याची चर्चा झाली होती मात्र या दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया देणं त्यावेळी टाळलं होतं.

Viral होतेय प्रियांका चोप्रा आणि निक जोनसची पब्लिक किस

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सनीला याच व्हायरल व्हिडिओबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सनी म्हणाला, 'या जगात लोकांकडे अशाप्रकारच्या गोष्टी बोलण्यासाठी बराच रिकामा वेळ आहे. मी याआधीही बोललो आहे की, कोणता व्हिडिओ व्हायरल होत आहे किंवा लोक माझ्याबद्दल काय बोलतात याने मला अजिबात फरक पडत नाही. मी कशासाठी जबाबदार आहे हे मला माहित आहे. त्यामुळे याचं उत्तर देण्यासाठी मी कोणालाही बांधिल नाही.'

India’s Most Wanted Trailer- ये जंग है इसमे कुछ भी हो, चाहे मरेंगे या मारेंगे

पुजा देओलशी लग्न केल्यानंतरही सनी देओल डिंपल कपाडियासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. तसेच राजेश खन्नासोबत लग्न केल्यानंतरही डिंपल कपाडिया वेगळी राहत होती. सूत्रांच्या माहितीनुसार एकेकाळी सनी आणि डिंपल यांच्या नात्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या मात्र नंतर रवीना टंडनमुळे सनी आणि डिंपलमध्ये दुरावा आला होता.

कंगना रनौत डॉक्टरांच्या निशाण्यावर, 'मेंटल है क्या'च्या अडचणीत वाढ

First published: May 2, 2019, 3:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading