VIDEO-...म्हणून आईचा हात सोडून आराध्या बाबा अभिषेककडे पळत गेली

VIDEO-...म्हणून आईचा हात सोडून आराध्या बाबा अभिषेककडे पळत गेली

आतापर्यंत दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा झाल्या. पण प्रत्येकवेळी अभि-अॅशने त्यांच्या घट्ट नात्याने चर्चांवर कायमस्वरुपी पूर्णविराम दिला.

  • Share this:

मुंबई, २ मे- बी- टाउनमधील सर्वात आवडत्या जोड्यांमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या जोडीचा आवर्जुन उल्लेख केला जातो. आतापर्यंत दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा झाल्या. पण प्रत्येकवेळी अभि-अॅशने त्यांच्या घट्ट नात्याने चर्चांवर कायमस्वरुपी पूर्णविराम दिला.

एक उत्कृष्ट कपलसोबतच आदर्श पालक कसं व्हावं याचे धडेही अनेक कलाकार या दोघांकडून घेत असतात. नुकताच या तिघांचा फुटबॉल कोर्टवरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आराध्याने जेव्हा अभिषेकला पाहिले तशी ती ऐश्वर्याचा हात सोडून त्याच्याकडे धावत गेली आणि त्याला मिठी मारली.

Viral होतेय प्रियांका चोप्रा आणि निक जोनसची पब्लिक किस

त्याचं झालं असं की, ऐश्वर्या आणि आराध्या अभिषेकचा फुटबॉल सामना पाहायला गेले होते. हा सामना सिनेविरुद्ध टीव्ही कलाकार असा रंगला होता. अभिषेकसोबत रणबीर कपूर, दिनो मोर्या, अरमान जैन, अहान शेट्टी, शूजीत सरकार आणि इतर कलाकार खेळत होते. तर टीव्हीच्या टीममध्ये करन टॅकर, विविअन डीसेना, शब्बीर अहलुवालिया यांसारखे कलाकार होते.

प्रियांकाच्या दीराने लास वेगासमध्ये केलं Game Of Throne च्या अभिनेत्रीशी लग्न
 

View this post on Instagram
 

As soon as baby #aradhyabachchan sees her dad on the ground, she runs towards him and gives him a tight hug ❤️❤️. So cool 👍 #aishwaryabachchan


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

KBC 11: रजिस्ट्रेशनसाठी बिग बींनी विचारला 'हा' भन्नाट प्रश्न

या सामन्याला अभिषेकला प्रोत्साहित करण्यासाठी यो दोघी आल्या होत्या. अटीतटीच्या या सामन्यात बॉलिवूडकर विजयी झाले. सामना संपल्यानंतर नवऱ्याचं अभिनंदन करण्यासाठी ऐश्वर्या मैदानात गेली होती. तेव्हा वडिलांना पाहून आराध्या धावत अभिषेककडे गेली आणि त्याला घट्ट मिठी मारली. अभिषेकनेही तिला लगेच उचलून घेतलं. बाप लेकीचं हे प्रेम तिथे उपस्थित सारेच पाहत होते. आराध्यानंतर ऐश्वर्यानेही मिठी मारत अभिषेकला विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याला आराध्यामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. जेव्हाही ऐश्वर्या आराध्याला घेऊन बाहेर पडते तेव्हा नेहमीच तिचा हात पकडते. सोशल मीडियावर तिच्या याच गोष्टीला ट्रोल करण्यात आलं होतं.

डिंपल कपाडिया सोबतच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अखेर बोलला सनी देओल

टपरीवर पुरंदरची भेळ आणि उसाचा रस, आमिर-किरणचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 04:47 PM IST

ताज्या बातम्या