मुंबई, 02 ऑक्टोबर : अभिनेत्री आणि डान्सर असणाऱ्या नोरा फतेही (Nora Fatehi) इंडियाज बेस्ट डान्सर (India's Best Dancer) या शोला अलविदा करत आहे. गेल्या काही एपिसोड्समध्ये नोरा पाहुणी परिक्षक म्हणून दिसत होती. या शो मध्ये परिक्षक असणाऱ्या मलायका अरोराला (Malaika Arora) कोरोनाची लागण झाल्यामुळे या कार्यक्रमात नोरा परिक्षकाचं काम पाहत होती. पण आता मलायका बरी झाल्यानंतर ती कमबॅक करतेय. या कारणामुळे नोरा India's Best Dancer मध्ये दिसणार नाही आहे.
नोरा फतेही काही दिवसांपूर्वी एका व्हायरल व्हिडीओमुळे खूप चर्चेत आली होती. या वादग्रस्त व्हिडीओमध्ये कोरिओग्राफर टेरेन्स लुईसने नोराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यावेळी नोराने टेरेन्सला पाठिंबा देत सर्व आरोपांचं खंडन केलं होतं.
आता पु्न्हा नोरा फतेही हा शो सोडत असल्याने ती चर्चेत आली आहे. या शो मध्ये तिने कमी कालावधीत लोकप्रियता मिळवली होती.
(हे वाचा-Actor Akshat Death Case: 'लग्नास नकार दिल्याने फ्लॅटमेटने केली हत्या')
त्याचप्रमाणे स्पर्धक, इतर परिक्षक आणि प्रेक्षक यांच्यामध्ये देखील ती फेव्हरिट बनली होती. या काळात शोचा TRP देखील वधारला होता. त्यामुळे तिला शो सोडावा लागत असल्याने या सर्वांमध्येच नाराजीचं वातावरण आहे.
या कार्यक्रमात परिक्षक असणाऱ्या बॉलिवूड कोरिओग्राफर गीता कपूर (Geeta Kapoor) हिने देखील तिच्या जाण्याबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
(हे वाचा-या महिला खासदार दिसणार SOS Kolkata मध्ये, सिनेमाच्या टीजरला नेटकऱ्यांची पसंती)
गीता माँ ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने नोराबरोबरच्या फोटोंचं कोलाज शेअर केलं आहे आणि तिच्याबद्दल लांबलचक पोस्ट देखील लिहिली आहे. गीता कपूरने नोराला 'Special Part my Life' म्हटलं आहे. या आठवड्यात ऑन एअर जाणाऱ्या एपिसोडमध्ये नोरा शेवटची या स्टेजवर दिसणार आहे.