मुंबई, 22 मार्च: कलाकारांच्या घरी चोरी होण्याची प्रकरण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. साऊथ सुपरस्टार रजनिकांत यांच्या मुलीच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. घरातील सोन्याचे दागिनी लंपास करण्यात आले. 18 वर्षांपूर्वी घरात काम करणाऱ्या एका हेल्परनं ही चोरी केल्याचं समोर आलं. दरम्यान हे प्रकरण ताज असताना प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी देखील चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. सोनू निगमचे वडील आगम कुमार निगम यांच्या घरातून तब्बल 72 लाख रुपयांची चोरी झाली आहे. घरातील इतकी रक्कम चोरी झाल्यानं निगम कुटुंब चिंतेत आहे. घरात काम करणाऱ्या नोकरानं पैशांची चोरी केल्याचा संशय सोनू निगमचे वडील आगम निगम यांना आहे. या प्रकरणी सोनू निगम आणि त्याच्या वडिलांनी मुंबईच्या ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून 72 लाखांच्या चोरीचा लवकरच छडा लावतील. मिळालेल्या माहितीनुसार सोनी निगमच्या वडिलांच्या घरी काम करणाऱ्या जुन्या ड्रायव्हरवर 72 लाखांच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू निगमचे वडील आगमकुमार निगम हे ओशिवरा, अंधेरी वेस्ट येथील विंडसर ग्रँड या बिल्डिंगमध्ये राहतात. त्यांच्या घरी 19 मार्च ते 20 मार्च चोरी झाल्याचं त्यांनी पोलिसांनी सांगितलं आहे. सोनू निगमची धाकटी बहीण निकिता हिनं बुधवारी ओशिवरा पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये सांगितल्यानुसार रेहान नावाचा एक ड्रायव्हर त्यांच्या घरी 8 महिने ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. पण त्याचं काम व्यवस्थित नसल्यानं त्याला काही दिवसांआधीच कामावरून काढून टाकलं होतं. हेही वाचा - कुली नं 1! दादर स्टेशनवर हमालाला सापडला अमिताभ बच्चन यांच्या खास व्यक्तीचा महागडा फोन, अन मग…. रविवारी सोनू निगमचे वडील मुलगी निकिताच्या वर्सोवा येथील घरी जेवण्यासाठी गेले होते. जेवण करून ते घरी आल्यानंतर त्यांना घरातील लाडकी कपाटातील डिजिटल लॉकरमधून 40 लाख गायब झाल्याचं कळलं. त्यांनी तात्काळ पोलिसांना हे कळवलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोनू निगम व्हिसासंबंधीत कामासाठी मुलाच्या सात बंगला येथील घरी गेले आणि संध्याकाळी आपल्या घरी परतले. तेव्हा त्यांना लॉकरमध्ये 32लाख रूपये गहाळ असल्याचं आढळलं. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी सोनू निगमच्या वडीलांच्या आणि बहिणीच्या सोसायटीचे सीसीटीव्ह फुटेज चेक केले. त्यात त्यांना त्यांचा जुना ड्रायव्हर रेहान दोन दिवस बॅग घेऊन फ्लॅटच्या दिशेने जाताना दिसला. सोनू निगम यांच्या वडीलांना संशय आहे की, रेहाननं ड्युप्लिकेट चाव्या तयार करून ही चोरी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.