जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / KK Death: बॉलिवूडमधील 'या' व्यक्तीने KK ला दिला होता दिल्लीहून मुंबईत येण्याचा सल्ला

KK Death: बॉलिवूडमधील 'या' व्यक्तीने KK ला दिला होता दिल्लीहून मुंबईत येण्याचा सल्ला

KK Death: बॉलिवूडमधील 'या' व्यक्तीने KK ला दिला होता दिल्लीहून मुंबईत येण्याचा सल्ला

बॉलिवूडचा (Bollywood) लोकप्रिय गायक केकेचं (Singer KK) काल रात्री कोलकत्ता येथे निधन झालं. तो कोलकत्ता येथील एका कॉलेज कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 जून-   बॉलिवूडचा   (Bollywood)  लोकप्रिय गायक केकेचं  (Singer KK)  काल रात्री कोलकत्ता येथे निधन झालं. तो कोलकत्ता येथील एका कॉलेज कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होता. दरम्यान त्याची प्रकृती बिघडल्याने पहिला त्याला हॉटेल रूमवर आणि नंतर कोलकत्ता येथील CMRI हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. केकेला ‘पल’ या पहिल्या अल्बममधून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. ‘यारों’, ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘तडप तडप के’ या गाण्यानीं केकेच्या करिअरमध्ये मोठं यश मिळवून दिलं होतं. केके आपल्या यशाचे श्रेय पत्नी ज्योतीला देतात. एका मुलाखतीत त्यांनी गायक हरिहरन यांच्यामुळे आपण मुंबईला आल्याचं सांगितलं होतं. केकेने सोनी म्युझिक इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी 1994 मध्ये मुंबईत येण्यापूर्वी त्यांनी हॉटेल इंडस्ट्रीत काम केलं होतं. केकेने म्हटलं होतं की, ‘आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पत्नी ज्योतीने खूप पाठिंबा दिला होता’’. आपल्या यशाचे श्रेय तो नेहमी आपल्या पत्नीलाच देत असे. ज्योती ही केकेची बालपणीची मैत्रीण आहे. केकेने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘‘एकदा दिल्लीत कुठेतरी गात असताना गायक हरिहरन यांनी त्याची दखल घेतली. हरिहरन यांनी त्याच्या गायनाचं कौतुक केलं आणि केकेला मुंबईला जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. काही काळानंतर केके मुंबईला आला. बॉलिवूडमध्ये गाण्यापूर्वी त्याने अनेक जिगल्स बनविल्या होत्या. **(हे वाचा:** ज्योतीसोबत लग्न करण्यासाठी KK ला करावी लागली होती अशी नोकरी, काही दिवसांपूर्वीच केला होता खुलासा ) केकेने ‘छोड आये हम वो गल्लियाँ’ या ‘माचीस’मधील गाण्यासोबत बॉलिवूड पदार्पण केलं होतं. विशेष म्हणजे त्याच्या पहिल्या गाण्यात हरिहरन, सुरेश वाडकर आणि विनोद सहगल हे सहगायक होते. विशाल भारद्वाज यांनी या गाण्याला संगीत दिलं होतं. तर हे गाणं गीतकार गुलजार यांनी लिहिलं आहे. हे गाणं एव्हरग्रीन आहे. आजही लोक तितक्याच आवडीने ऐकत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात