मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Life@25 Asha Bhosale : 16व्या वर्षी पळून लग्न; पन्नाशीत जुळले पंचम दांशी सुर, आशा भोसलेंची फिल्मी लव्ह लाईफ

Life@25 Asha Bhosale : 16व्या वर्षी पळून लग्न; पन्नाशीत जुळले पंचम दांशी सुर, आशा भोसलेंची फिल्मी लव्ह लाईफ

आज आपल्या आवाजामुळे लाखो लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आशा ताईं अशा अनेक प्रसंगातून गेल्या आहेत ज्याची आजची पिढी विचारही करू शकत नाही. गाणं, प्रसिद्धी, वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, डिप्रेशन ते सक्सेसफुल हॉटेल व्यावसायिक असलेल्या आशा ताईंचा प्रवास आजच्या News18लोकमतच्या डिजीटल प्राइम टाइम स्पेशल Life@25मध्ये जाणून घेऊया.

आज आपल्या आवाजामुळे लाखो लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आशा ताईं अशा अनेक प्रसंगातून गेल्या आहेत ज्याची आजची पिढी विचारही करू शकत नाही. गाणं, प्रसिद्धी, वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, डिप्रेशन ते सक्सेसफुल हॉटेल व्यावसायिक असलेल्या आशा ताईंचा प्रवास आजच्या News18लोकमतच्या डिजीटल प्राइम टाइम स्पेशल Life@25मध्ये जाणून घेऊया.

आज आपल्या आवाजामुळे लाखो लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आशा ताईं अशा अनेक प्रसंगातून गेल्या आहेत ज्याची आजची पिढी विचारही करू शकत नाही. गाणं, प्रसिद्धी, वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, डिप्रेशन ते सक्सेसफुल हॉटेल व्यावसायिक असलेल्या आशा ताईंचा प्रवास आजच्या News18लोकमतच्या डिजीटल प्राइम टाइम स्पेशल Life@25मध्ये जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 9 सप्टेंबर: आपल्या सुरेल आवाजानं अनेक दशके हिंदी, मराठी तसेच अनेक भाषांतील  गाण्यांनी प्रेक्षकांवर जादू करणारी सर्वांची लाडकी गायिका म्हणजे आशा भोसले. आजवर  20 भाषांमध्ये 12 हजारांहून अधिक गाणी गाणाऱ्या आशा भोसले आज त्यांचा 88 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आशा भोसलेंना लाडानं सगळेत आशा ताई म्हणतात. घरात आई वडील बहिण यांच्याकडून गायकिचा वारसा मिळालेल्या आशा ताईंनी गाण्यामध्ये उत्तम करिअर केलं. पण हे सगळं करत असताना त्यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र अनेक खाचा खळगांनी भरलेलं होतं. करियर करण्याच्या वयात एकीकडे करियर घडत होत पण दुसरीकडे मात्र वैयक्तिक पातळीवर आशा ताईंचा वेगळात संघर्ष सुरू होता. आज आपल्या आवाजामुळे लाखो लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आशा ताईं अशा अनेक प्रसंगातून गेल्या आहेत ज्याची आजची पिढी विचारही करू शकत नाही. गाणं, प्रसिद्धी, वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, डिप्रेशन ते सक्सेसफुल हॉटेल व्यावसायिक असलेल्या आशा ताईंचा प्रवास आजच्या News18लोकमतच्या डिजीटल प्राइम टाइम स्पेशल Life@25मध्ये जाणून घेऊया. आशा भोसले आजही कितीही मोठ्या दिग्गज गायिका असल्या तरी आजन्म स्वर सम्राज्ञी दिवगंत लता मंगेशकर यांची लहान बहिण आणि पंडीत मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची कन्या ही दोन नावं त्यांच्या पाठीशी राहीली. आशा ताईंना देखील याचा कायमच अभिमान वाटतो. वडीलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी लता दीदींनी घेतली. दीदींना साथ मिळावी आशा ताईंना गायकी सुरू केली. गाणं जन्मपासून गळ्यात होतचं मात्र मोठ्या मंचावर ते आलं नव्हतं. आशा भोसलेंच्या आवाजाचा गोडवा जस जसा पसरत गेला तसा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी दिवसेंदिवस वाढत गेल्या.

एक काळ असा होता जेव्हा लता दीदींचा करिअर एका महत्त्वाच्या टप्प्यावर सुरू होतं. दीदींची लोकप्रियता वाढू लागली होती. त्यामुळे बाकीच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी दीदींना एक पीए ठेवला. ज्याच नावं होतं गणपतराव भोसले. भोसले दीदींची बाहेरची सगळी काम पाहायचे. अनेकदा ते घरी यायचे. हेही वाचा  - Life @25: बॅडमिंटन प्लेयर ते अभिनेत्री! 41व्या वर्षी अभिनय क्षेत्रात आल्या किरण खेर अन् पहिलाच सिनेमा झाला हिट 16 व्या वर्षी पळून केलं लग्न दरम्यान भोसले आणि आशा ताईंची ओळख वाढली त्यांच्यात प्रेम निर्माण झालं गोष्टी लग्नापर्यंत पोहोचल्या. 16 वर्षांच्या आशा ताई आणि 31 वर्षांच्या गणपतरावांचं लग्न लावून देण्यासाठी घरचे सहमत नव्हते. दीदींनी देखील आशा ताईंना अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आशा ताई आणि भोसलेंनी निर्णय घेतला आणि घरातून पळून जाऊन लग्न केलं. आशा ताईंच्या लग्नानंतर अनेक वर्ष त्यांना मंगेशकर कुटुंबापासून दूर रहावं लागलं होतं. दोघांनी एकमेकांच्या सहमतीनं लग्न केलं खरं मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. एका मुलाखतीत आशा ताईंनी म्हटलं होतं की, गणपतरावांच्या कुटुंबानं आशाताईंना स्वीकारलं नव्हतं. त्यांना अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला. अखेर एक दिवस असा आला जेव्हा आशा ताई भोसलेंच्या घरातून पळून माहेरी निघून आल्या. पदरात असलेल्या दोन मुलांबरोबर आणि पोटात वाढत असलेल्या एका बाळासह त्यांनी घर सोडलं ते कायमचंच. हेही वाचा - Life@25 : 'आई आणि बायको खूप भांडतात; त्यांच्यातील वाद कसा सोडवू?' पहिल्या लग्नातून मिळालेली चांगली गोष्ट वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजेच 1949 साली आशा ताईंनी गणपतराव भोसलेंबरोबर लग्न केलं. जवळपास 10 वर्षांच्या संसारानंतर 1960 ते वेगळे झाले. गणपत रावांबरोबर घेतलेल्या निर्णयाचा आशाताईंना अनेक वर्ष पश्चाताप सहन करावा लागला होता. पहिल्या लग्नामुळे आशाताईंनी अनेक त्रासाला सामोरं जावं लागलं. गाणं आशाताईंच्या रक्तात होतं आणि सासरच्यांनी तेच बंद करण्याची सक्त ताकिद दिली. आशा ताई केवळ स्वयंपाक घरात जेवण बनवायच्या. पण त्यातही त्यांनी कधी तक्रार केली नाही. जेवण बनवणं त्यांच्यासाठी एक स्ट्रेट बस्टर होता. जेवण करता करता त्या त्यांचे अनेक प्रोमबल्स विसरून जायच्या. पहिल्या लग्नातून त्यांनी ही एकमेक चांगली गोष्ट मिळाली होती. आरडी बर्मन यांच्याशी ओळख भोसलेंच घर सोडल्यानंतर 1956मध्ये आशा ताईंची ओळख आरडी बर्मन यांच्याबरोबर झाली. तोवर आशा ताई इंडस्ट्रीमधील चांगल्या गायिका झाल्या होत्या. 'तिसरी मंजिल'च्या निमित्तानं आशा भोसले आणि आणि आरडी बर्मन एकत्र आले. तेव्हा दोघांचंही पहिलं लग्न मोडलं होतं. आरडी बर्मन अर्थात पंचम दा त्यांची पहिली बायको रीता पटेलपासून वेगळे झाले होते. त्या काळात आशा ताई पंचम दांचे सुर जुळले. पंचम दांसाठी आशा ताईंवर अनेक गाणी गायलीत.त्यावेळी पंचम दांचं संगीत आणि आशा ताईंचा आवाज हे एकमेकांसाठीच बनले आहेत असं वाटत होतं. अखेर 1980मध्ये दोघांनी लग्न केलं. दोघेही खाण्याचं शौकीन होते. दोघे एकत्र अनेक हॉटेल्समध्ये जेवायला जायचे. पण पंचम आणि आशा यांच्या म्युझिकल लव्हस्टोरीची ही सफर जास्त काळ टिकली नाही. लग्नानंतर 14 वर्षांनी पंचम दांनी आशा ताईंना सोडून वयाच्या 54व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंचम दांच्या जाण्यानंतर आशा ताई डिप्रेशमध्ये गेल्या होत्या. जेवण बनवण्याची कला कामी आली पंचम दा गेल्यानंतर आशा ताई डिप्रेशमध्ये गेल्या होत्या. गाण्यापासूनही त्या लांब होत्या. पण या काळात त्यांना पाककलेनं बाहेर काढलं. कुटुंबियांनी त्यांनी स्वयंपाक घरात जेवण करण्यासाठी फोर्स केल्या. आशा ताई स्वयंपाक करू लागल्या. उत्तम जेवण करण्याची रूची त्यांना वाटू लागली. त्या डिप्रेशमधून बाहेर आल्या. त्यानंतर त्यांनी आपली जेवण बनवण्याची आवड जोपासत पुढे हॉटेस व्यावसायातही उतरल्या. परदेशात आज आशा ताईंचे आलिशान हॉटेल्स आहेत.
First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Digital prime time

पुढील बातम्या