जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Life @25: बॅडमिंटन प्लेयर ते अभिनेत्री! 41व्या वर्षी अभिनय क्षेत्रात आल्या किरण खेर अन् पहिलाच सिनेमा झाला हिट

Life @25: बॅडमिंटन प्लेयर ते अभिनेत्री! 41व्या वर्षी अभिनय क्षेत्रात आल्या किरण खेर अन् पहिलाच सिनेमा झाला हिट

Life @25: बॅडमिंटन प्लेयर ते अभिनेत्री!  41व्या वर्षी अभिनय क्षेत्रात आल्या किरण खेर अन् पहिलाच सिनेमा झाला हिट

खणखणीत आवाज, गालात गोड खळी पाडणारं हसू, एक उत्तम व्यक्ती आणि दमदार अभिनय करणारी अभिनेत्री म्हणून किरण खेर यांची ओळख आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 सप्टेंबर :  आपण अनेकदा घरच्यांकडून किंवा नातेवाईकांकडून एक गोष्ट नक्की ऐकत आलो आहे ती म्हणजे हे बघ हेच वय आहे आताच करिअर सुरू कर तर पुढे जाऊन योग्य वयात सेटल होशील. वय उलटून गेल्यानंतर गोष्टी कठीण होतील. हा लेख वाचणाऱ्या पैकी अनेकांनी या गोष्टीवर विश्वास ठेवून वयाच्या 21-22व्या वर्षी करिअरला सुरूवात केली असेल. पण चित्रपटसृष्टीबाबत बोलायचं झालं तर अनेक बॉलिवूडमध्ये आता अनेक स्टार कि़ड्स आहेत ज्यांनी वयाच्या 17-18व्या वर्षीच अँक्टिंग करिअरला सुरूवात केली आहे. पण बॉलिवूडमधील काही सितारे असेही आहेत ज्यांनी वयाच्या 30-35व्या वर्षी आपल्या अँक्टिग करिअरला सुरूवात केली आणि आपल्या तगड्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आज अशाच एका कलाकाराविषयी जाणून घेऊया जिचं नाव आहे अभिनेत्री किरण खेर. खणखणीत आवाज, गालात गोड खळी पाडणारं हसू, एक उत्तम व्यक्ती आणि दमदार अभिनय करणारी अभिनेत्री म्हणून किरण खेर यांची ओळख आहे.  मोठ्या पडद्यावर साकारलेली त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांनी आपली वाटली. चंदीगडमधून दोन लोकसभा निवडणूका जिंकणाऱ्या किरण यांचा अभिनयाप्रमाणेच राजकारणातही तितकाच मोलाचा वाटा आहे.

News18

किरण यांचा जन्म 14 जून 1952 साली पंजाबच्या चंदीगडमध्ये झाला. बालपणापासून काही किरण अभिनय क्षेत्रात अभिनय काय असतो हे माहित नसताना त्या एक सक्सेसफुल बॅडमिंटन खेळाडू होत्या. अभिनेत्री दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण यांच्याबरोबर किरण खेर यांनी राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळलं आहे. शाळा संपली तरुण वय सुरू झालं आणि किरण कॉलेजला जाऊ लागल्या तसं त्यांचं खेळाकडील लक्ष कमी होऊ लागलं. किरण खेर आणि अनुपम खेर हे आजही बॉलिवूडसाठी कितीही आदर्श कपल असलं तरी किरण खेर अनुपम यांची दुसरी पत्नी आहे.  महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर किरण खेर यांनी वयाच्या 27व्या वर्षी मुंबईतील पेशानं व्यावसायिक असलेल्या गौतम बेरी यांच्याशी लग्न केलं. 1979मध्ये किरण खेर यांनी लग्न केलं. 1982मध्ये त्यांनी मुलगा सिकंदरला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर किरण आणि गौतम यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक खटके उडाले आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हेही वाचा - Life@25 : सलाम! दारु विकणाऱ्यांचा मुलगा कलेक्टर, भील समाजाच्या तरुणाची हुंदका दाटून आणणारी कहाणी घटस्फोट झाल्यानंतर किरण 1980च्या दशकात चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याचा प्रयत्न  केला. परंतु त्यांना यश आलं नाही. अनेक निर्मात्यांकडे जाऊन त्या काम मागत होत्या. भूमिका शोधत असतानाच एके दिवशी किरण यांची अनुपम खेर यांच्याशी ओळख झाली.  त्याकाळात दोघेही बॉलिवूडचे स्ट्रगलर कलाकार होतो. त्याचप्रमाणे दोघांच्या वैयक्तिक आयुष्याची गाडीही काहीश्या सारख्या वळणावर  सुरू होती. अनुपम खेर यांचंही पहिलं लग्न झालं होतं मात्र काही कारणांमुळे ते ही तेव्हा घटस्फोट घेण्याच्या विचारात होते.  किरण आणि अनुपम यांची चंदीगड येथील विद्यापीठात ओळख झाली होती. दोघांनी ‘चांदपुरी की चंपाबाई’ या नाटकात एकत्र काम केलं होतं.  किरण खेर यांना बॉलिवूडमध्ये कामं मिळत गेली आणि तिथेच दोघांचं प्रेम जमलं आणि अनुपम खेर यांनी पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन किरण यांच्याशी लग्न केलं. हेही वाचा - Life@25 : एकला चलो रे! सोलो ट्रिपसाठी जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही आहेत उत्तम ठिकाणं या सगळ्यात किरण खेर यांनी आपल्या अभिनयाची सुरूवात वयाच्या 41 व्या वर्षी केली. मुलाच्या जन्मानंतर एक वर्षांनी 1983मध्ये किरण यांनी ‘आसरा प्यार दा’ या पंजाबी फिचर फिल्ममधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर 1996 पर्यंत त्या या क्षेत्रापासून दूर राहिल्या. नव्वदच्या दशकाच्या मध्यावर किरण खेर पुन्हा अभिनय क्षेत्रात सक्रीय झाल्या आणि नाटकात काम करू लागल्या. त्यानंतर त्यांनी अनेक टेलिव्हिजन शो होस्ट केले. त्यानंतर 2002मध्ये आलेल्या ‘देवदास’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. देवदासमध्ये साकारलेली पारोच्या आईची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.  त्यानंतर त्यांनी ‘वीरझारा’, ‘मै हू ना’, ‘फना’, ‘दोस्ताना’, ‘ओम शांती ओम’, ‘सरदारी बेगम’ आणि ‘रंग दे बसंती’ सारख्या एकाहून एक दमदार सिनेमात शानदार अभिनय केला. अभिनेत्री किरण खेर यांनी ‘सरदारी बेगम’ या सिनेमासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. आयुष्यात करिअर करण्याच्या एका ठरावीक वेळेनंतर करिअरला सुरुवात करणाऱ्या किरण खेर यांनी अल्पावधीत आपल्या अभिनयानं वेगळा चाहता वर्ग तयार केला. वयाची सत्तरी गाठलेल्या किरण खेर आजही सिनेसृष्टीत सक्रीय होत्या मात्र अशा हरहुन्नरी अभिनेत्रीवर कॅन्सर सारख्या आजारानं जखडून ठेवलं आहे. अभिनेत्री किरण खेर सध्या मल्टीपल मायलोमा सारख्या कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत आहेत. त्यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. आपली आवड आणि ध्येय सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात असेल तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर करिअर करणं सहज सोपं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात